Homeताज्या बातम्यादेश

घराणेशाहीमुळे काँग्रेसचे दुकान बंद होण्याची वेळ

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकसभेत टीका

नवी दिल्ली ः निवडणूक जवळ आली आहे, अशावेळी काहीतरी नवे घेऊन समोर यायचे असते. मात्र आज विरोधी पक्षाची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेसला दहा वर्षात व

काँग्रेसला आपल्याच नेत्यांची गॅरंटी नाही
पंतप्रधान मोदींचा मेट्रोला हिरवा झेंडा
पंतप्रधान मोदी उद्या करणार जागतिक बौद्ध शिखर परिषदेचे उद्घाटन

नवी दिल्ली ः निवडणूक जवळ आली आहे, अशावेळी काहीतरी नवे घेऊन समोर यायचे असते. मात्र आज विरोधी पक्षाची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेसला दहा वर्षात विरोधी पक्ष म्हणूनही मोठे होता आले नाही. विरोधात इतरही तेजस्वी लोक आहेत. मात्र त्यांची उमेद घालवण्याचेही कामही काँग्रेसने केले. तरुण पिढीला पुढे जाऊ दिले नाही. काँग्रेसने विरोधी पक्षाचे, स्वतःचे, संसदेचे आणि देशाचे खूप मोठे नुकसान केले. देशाला खूप चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे. देशाने घराणेशाहीची खूप मोठी किंमत मोजली, घराणेशाहीमुळेच काँगे्रसचे दुकान बंद होण्याची वेळ आली आहे, अधीररंजन चौधरींची अवस्था आपण पाहतोच आहोत असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँगे्रसला लगावला. पंतप्रधान मोदी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देत होते.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडला. मल्लिकार्जुन खरगे हे लोकसभेतून राज्यसभेत गेले. एकच प्रॉडक्ट वारंवार लाँच केल्याने काँग्रेसच्या दुकानाला कुलुप लागायची वेळ आली आहे. दुकान आम्ही म्हणत नाही. काँग्रेसचे लोक स्वतःच म्हणत आहेत. आमचे दुकान आहे याचा उल्लेख यांचेच लोक करतात. असे म्हणत मोदी यांनी राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’ शब्दावर टीका केली. यासोबतच भारतीय लोक हे आळशी आहेत भारतीयांना कष्ट करण्याची सवय नाही, युरोप, जपान, चीन, रशिया, अमेरिका या देशांइतकी मेहनत आपण भारतीय करत नाही असे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वाटायचे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

घराणेशाहीचे राजकारण देशासाठी घातक – पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. कुटुंब किंवा विशिष्ट घराणंच जेव्हा पक्ष चालवते तेव्हा घराणेशाहीचा प्रश्‍न आहे. आम्हालाही वाटते की या विषयावर चर्चा केली गेली पाहिजे. घराणेशाहीचे राजकारण हा सगळ्यांच्या चिंतेचा विषय असला पाहिजे. एखाद्या कुटुंबातले दोन काय दहा लोक प्रगती करत असतील तर मी स्वागत करेन. प्रश्‍न हा आहे की घराणेच जिथे पक्ष चालवतात. लोकशाहीसाठी हे संकट आहे. काँग्रेस एका कुटुंबातच गुरफटून गेलेला पक्ष. लोकांच्या आशा-अपेक्षा काय आहेत याच्याशी त्यांना घेणंदेणं नाही. काँग्रेसमध्ये कॅन्सल कल्चर निर्माण झाले आहे. काहीही करा, सगळे कॅन्सल. मेक इन इंडिया म्हटले की काँग्रेस म्हणते कॅन्सल. आत्मनिर्भर भारत, काँग्रेस म्हणते कॅन्सल. नवे संसद भवन, काँग्रेस म्हणतं कॅन्सल. या सगळ्या गोष्टी मोदींनी उभ्या केलेल्या नाहीत या देशाच्या असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

COMMENTS