Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत कवी महिपती महाराजांच्या फिरता नारळी हरिनाम सप्ताहास सुरूवात

देवळाली प्रवरा ः प्रतीपंढरपूर म्हणून परिचित असलेल्या राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील संत चरित्रकार श्री संत कवी महिपती महाराज यांच

माजी मंत्री, ज्येष्ठ सहकार नेते शंकरराव कोल्हे यांचे वृद्धापकाळाने निधन
कोपरगावमध्ये डिझेल चोरी करणारे जेरबंद
पाथर्डी शहरात रामनवमीनिमित्त भव्य मिरवणूक

देवळाली प्रवरा ः प्रतीपंढरपूर म्हणून परिचित असलेल्या राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील संत चरित्रकार श्री संत कवी महिपती महाराज यांचा 58 वा  फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताहास व श्री संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव निमित्त गाथा पारायणास श्रीक्षेत्र म्हैसगाव येथील केदारेश्‍वरांच्या प्रांगणात आज रविवार दि.28 एप्रिल पासून प्रारंभ झाला आहे. या सोहळ्याची सांगता रविवार दि.5 मे 2024 रोजी होणार असून सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सप्ताह समितीने केले आहे.
               महिपती महाराजांचा फिरता अखंड हरिनाम सप्ताह व दैनंदिन गाथा पारायण सोहळा भाविकांच्या उपस्थितीत चैत्र वद्य चतुर्थी ते चैत्र वद्य द्वादशी ह्या पर्वणीत होणार आहे. संत महिपतींच्या वाड्मयाची पारायणे व कीर्तन महोत्सव गावोगावी व्हावे, सर्वांनी त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न करावा, हाच उद्देश मनीमानसी धरून वै. ब्रह्मलीन धनाजीबाबा गागरे मांडवेकर यांच्या संकल्पनेतून प्रारंभित झालेला फिरता सप्ताह श्रीक्षेत्र म्हैसगाव ग्रामस्थ, पंचक्रोशी व श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान आयोजित भाविकांच्या उपस्थितीत देवदुर्लभ सप्ताह महोत्सव अत्यंत हर्षउल्हासात गुरुवर्य प.पु. लक्ष्मणजी महाराज पांचाळ व बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. यानिमित्ताने श्रीक्षेत्र म्हैसगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  त्यामध्ये पहाटे काकडा भजन, अभिषेक, सकाळी ग्रामप्रदक्षिणा, गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ व सायंकाळी 7 ते 9 वा. कीर्तन व रात्री जागर आदीं कार्यक्रम संपन्न होणार आहेत. ह्या सोहळ्यातील भव्यदिव्य प्रहरा मंडप, व्यासपीठ, भटारखाना, विद्युत रोषणाई, सुरुची भोजन, गाथा पारायण, नामवंत कीर्तनकारांची प्रवचन सेवा व कीर्तन सेवा ही ह्या सोहळ्याची वैशिष्ट्ये ठरणार आहेत. दि.28 रोजी कीर्तनसेवा मनोहर महाराज सिनारे,दि.29 रोजी आदिनाथ महाराज दुशिंग, दि.30 रोजी सकाळी 10 वा. ब्रह्मलीन धनाजीबाबा गागरे यांच्या 50 व्या पुण्यतिथीनिमित्त भगवान महाराज यमगर व रात्री समाधान महाराज पाटील, दि.1 मे रोजी नंदकिशोर महाराज खरात, दि.2 मे रोजी सत्यवान महाराज लाटे, दि.3 मे रोजी एकनाथ महाराज सांगोलकर, दि.4 मे रोजी सकाळी एकादशीनिमित्त 10वा. अरुणनाथ गिरीजी महाराज मठाधिपती,अडबंगनाथ संस्थान भामाठाण व रात्री लक्ष्मण महाराज पांचाळ व रविवार दि. 5 मे रोजी सकाळी 10 वा. महंत अर्जुनजी महाराज तनपुरे मठाधिपती, श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. ह्या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान व सप्ताह समितीने केले आहे.

COMMENTS