Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हॉटेल व्यावसायिकावर तलवार, रॉडने हल्ला

अहमदनगर/प्रतिनिधी ः केडगाव उपनगरातील एका हॉटेल व्यावसायिकाला घरात घुसून तलवार, लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 4) दुपारी केडगाव (घ

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही – निर्मला सीतारामन
कर्नाटक अपघातात सात जणांचा मृत्यू
गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास डॉक्टरांचा नकार; प्रवेशद्वारावर दिला बाळाला जन्म

अहमदनगर/प्रतिनिधी ः केडगाव उपनगरातील एका हॉटेल व्यावसायिकाला घरात घुसून तलवार, लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 4) दुपारी केडगाव (घशवसर्रीं) उपनगरात घडली. मतीन सादीक सय्यद (वय 32 रा. एकनाथनगर, नेप्ती रस्ता, केडगाव) असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान कोतवाली पोलिसांना बुधवारी (दि. 6) दिलेल्या जबाबावरून फिरोज हमीद सय्यद, त्याची पत्नी अफरिन सय्यद व अनोळखी तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतीन हे रेहमानी ट्रस्टचे सदस्य असून ते मस्जिदचे देखभाल व साफसफाईचे काम पाहतात. त्यांच्या सांगण्यावरून दोन महिला कामगार मस्जिदकडे जाणार्‍या रस्त्यावरील गवत काढण्याचे काम करत होत्या. त्याला फिरोज व त्याच्या पत्नीने विरोध केला. मतीन त्यांना समजून सांगण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. दरम्यान, मतीन घरी गेले असता दुपारी तीनच्या सुमारास फिरोज, त्याची पत्नी व अनोळखी तिघे त्यांच्या घरी गेले. त्यांच्याकडे तलवार, लोखंडी रॉड होते. त्यांनी मतीन यांच्यावर तलवार, रॉडने हल्ला करून जखमी केले. जखमी मतीन यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS