Homeताज्या बातम्या

‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत साठ टक्के मतदान

पाथर्डी : वृद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या दोन जागेसाठी झालेल्या निवडणुकीत साठ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत ८ हजार ७०८ मतदारांपैकी ५ हजार ६८० इतक्या मतदारांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान निवडणुकीत सत्ताधारी आमदार मोनिका राजळे गटाने १९ पैकी १७ जागा बिनविरोध आपल्या ताब्यात घेत कारखान्याची सत्ता आपल्या ताब्यात घेतली असली तरीही कासार पिंपळगाव गटातून राजळे यांचे दीर शिवशंकर राजळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या गटातून दोन जागेसाठी कारखान्याचे चेअरमन आप्पासाहेब राजळे,उद्धव वाघ व शिवशंकर राजळे असा तिरंगी सामना होत आहे.   शुक्रवारी आदिनाथ नगर येथील एका हायस्कुल मध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी दहा पर्यंत मतदान संथगतीने चालू होते मात्र दहा नंतर मतदान केंद्राबाहेर मतदारांची मोठी रांग दुपारी चार वाजेपर्यंत लागली होती.कारखान्याचे बरेच सभासद हे वृद्ध असल्याने अनेकांनी व्हीलचेअरचा आधार घेत मतदान केले. निवडणूक प्रक्रिया ही बॅलेटपेपरवर पार पडल्याने मतदारांचा मतदान करताना वेळ लागत असल्याने संथ गतीने मतदान प्रक्रिया चालू होती.  सकाळपासूनच आमदार मोनिका राजळे, राहुल राजळे, कासार पिंपळगावच्या सरपंच मोनाली राजळे या मतदान केंद्रावर थांबून होत्या.  कारखान्याचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण तालुका असल्याने जवळपास सर्वच मतदार हे वाहनाने आल्याने मतदान केंद्राबाहेर वाहनांची मोठी गर्दी जमा झाली होती. कारखान्याची सत्ता जरी राजळे गटाच्या ताब्यात असली तरीही या निवडणुकीत उभे ठाकलेले तिनही उमेदवार हे एकमेकांचे निकटचे नातेवाईक असल्याने व जवळपास चार टर्म नंतर दोन जागेसाठी का होईना कारखान्याची निवडणूक होत असल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. आज पाथर्डी येथे मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत प्रसाद मते तहसीलदार डॉ. उद्धव नाईक हे लक्ष ठेऊन होते.

अहिल्यानगरमध्ये मोहरम विसर्जन मिरवणूक उत्साहात युवकांचा मोठा सहभाग;  कडेकोट पोलीस बंदोबस्त
व्याज परताव्यासाठी तातडीने निधी द्या : आ. तांबे
वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच कर आकारावाआ. आशुतोष काळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

COMMENTS