दखल- सरन्यायाधीशांच्या सत्कार निमित्ताने !

Homeदेशदखल

दखल- सरन्यायाधीशांच्या सत्कार निमित्ताने !

दखल - भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळाने सत्कार समारंभ आयोजित केला होता. अशा प्रकारचा सत्कार समारंभ न भूत

‘पेगासस’चे भूत
भ्रष्टाचार आणि तपास यंत्रणा
काँगे्रसला गटबाजीचे ग्रहण

दखल –

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळाने सत्कार समारंभ आयोजित केला होता. अशा प्रकारचा सत्कार समारंभ न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा होता, हे स्वतः सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले आहे. न्यायमूर्ती सरन्यायाधीश झाल्यानंतर महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी प्रशासनातील प्रमुख प्रोटोकॉल प्रमाणे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी प्रकट केली होती. त्यानंतर सर्व प्रशासन प्रमुख झाडून त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घेऊन त्यांचा विधीमंडळात सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमादरम्यान न्यायमूर्ती भूषण गवई यांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणी सांगत म्हटले की, जे सभागृह माझ्या वडिलांनी ३० वर्षे गाजवले, त्या सभागृहात होणारा सत्कार हा अभूतपूर्व आहे. मी नेहमीच स्वतःला भारतीय राज्य घटनेचा विद्यार्थी समजत आलो आहे, मी  दहावीत मध्ये असताना माझ्यात राज्यघटना रुजली. विधी मंडळात माझ्या वडिलांचे तीस वर्षापेक्षा जास्त वर्षे प्रेमाचे नाते राहिले आहे, त्या विधी मंडळात माझा सत्कार हा न भुतो न भविष्यती असा क्षण आहे, असे म्हणत या सत्कार सोहळ्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

भारतीय राज्य घटनेचे तीन स्तंभ आहेत, विधिपालिका न्याय पालिका आणि कायदेपालिका. राज्यघटनेनुसार कायदायचे पालन करण्याची जबाबदारी विधीपालिकेची आहे, न्याय व्यवस्था स्वतंत्र असावी दबाव तंत्रात नसावी ही भूमिका बाबासाहेब आंबेडकर यांची होती. स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर जातीभेद बाजूला ठेवून काम कराव लागेल, बाबासाहेब आंबेडकर यांचे ही मत असेच होते. 75 वर्षांचा कालखंड हा संविधानासाठी मोठा नाही, सामाजिक न्याय व्यवस्थेत न्याय देणारं संविधान आहे.

दोन महिला राष्ट्रपती झाल्या, दोन वेगवेगळ्या दलातील समुदायाच्या राष्ट्रपती झाल्याची आठवण सांगत सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक असलेल्या देशात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर काम करायला मिळत आहे. एका संवैधानिक पदावर काम करणे म्हणजे घटनेवर काम करणे अभिप्रेत असते. कारण, रक्तहीन क्रांती करण्याची ताकद संविधानात आहे. संविधानात काम करणे ही तारेवरची कसरत असते , पण आपणास त्या आधारावरच काम कराव लागतं. सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांना मिळालेली कारकीर्द ही छोटी असली तरी त्यांच्या कारकीर्दीच्या छटा मोठ्या असतील. कालच एका माजी सरन्यायाधीशांच्या संदर्भात देशभरात एक वाद उसळला होता.

त्यावर आपले नैतिक वर्तन काय असावे याचा एक आदर्शच या कार्यक्रमात न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दाखवून दिला. एकंदरीत, देशाच्या सरन्यायाधीश या संविधानिक लोकशाही च्या एका स्तंभाच प्रमुख होणं हा कोणत्याही व्यक्ती च्या जीवनात सर्वोच्च क्षण असतो. त्या क्षणाची अनुभूती न्यायमूर्ती बी. आर. गव‌ई यांनी घेतली, यात शंकाच नाही! स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर जातीभेद बाजूला ठेवून काम कराव लागेल, बाबासाहेब आंबेडकर यांचे ही मत असेच होते. ७५ वर्षांचा कालखंड हा संविधानासाठी मोठा नाही, सामाजिक न्याय व्यवस्थेत न्याय देणारं संविधान आहे.

COMMENTS