Homeताज्या बातम्या

मंत्री खडसे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; भाजप नेत्याच्या स्वकीय सहाय्यकाला पुण्यातून घेतले ताब्यात

पुणे: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याच्या ध्वनीमुद्रिका (ऑडिओ क्लिप) प्रकरणात पोलिसांनी महत्त्व

सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील आंदोलनास केजकरांचा पाठिंबा; विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध!
श्रीगोंद्यास शेतीसाठी तातडीने पाणी सोडा; संभाजी ब्रिगेडची कुकडी पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी
मुंबईत ‘रंगशारदा’ हॉटेलवर ईडीची मोठी कारवाई; तब्बल ३३२ कोटींची मालमत्ता जप्त, आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका
रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, मंत्री गिरीश महाजन आणि विजय चाैधरी  यांच्या धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठी अपडेट, थेट पीएनेच.. - Marathi ...

पुणे: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याच्या ध्वनीमुद्रिका (ऑडिओ क्लिप) प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते विजय चौधरी यांचे स्वकीय सहाय्यक यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणातील ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विजय चौधरी यांच्या नावाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेल्या विविध ऑडिओ क्लिप्स समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. त्यापैकी एका ऑडिओ क्लिपमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्यात संभाषण असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कथित संभाषणात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसेच रोहिणी खडसे यांच्याबाबत अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या ध्वनीमुद्रिकेत अश्लील व अवमानकारक शब्दप्रयोगही असल्याचा दावा केला जात असून, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

विजय चौधरी यांच्या नावाशी संबंधित आणखी काही कथित ऑडिओ क्लिप्सही समोर आल्या आहेत. त्यापैकी एका क्लिपमध्ये माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्याशी संवाद असल्याचा दावा केला गेला आहे. या कथित संभाषणात पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्याविषयीही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या सर्व ऑडिओ क्लिप्सच्या सत्यतेबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी त्यांची सध्या पोलीस चौकशी सुरू आहे.

अशी झाली कारवाई:

ऑडिओ क्लिप्स प्रसारित झाल्यानंतर विजय चौधरी यांच्या मुलाने उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्राथमिक तपासात स्वकीय सहाय्यक यश टिपरे याने विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील माहिती मेमरी कार्डमध्ये (स्मृती संचिका) उतरवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संशयावरून पोलिसांनी यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेतले असून, पुढील चौकशीसाठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या प्रकरणात ऑडिओ क्लिप्स नेमक्या कोणी तयार केल्या, त्या समाजमाध्यमांवर कशा प्रसारित झाल्या आणि त्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल शोध पोलीस घेत आहेत.

COMMENTS