जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रभावती ढाकणे यांना मातृशोक

Homeताज्या बातम्याअहमदनगर

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रभावती ढाकणे यांना मातृशोक

Ahilyanagar City News : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रभावती ढाकणे यांना मातृशोक झाला असून त्यांच्या मातुश्री यशोदाबाई सोपानराव चितळे यांचे

सर्वोदय विद्यामंदिरला तीन लाखांचे शैक्षणिक साहित्य
40 दिवसांत त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागेल”: भाजपा | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24
महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हिंदूद्रोही : आ. राणेंची टीका

Ahilyanagar City News : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रभावती ढाकणे यांना मातृशोक झाला असून त्यांच्या मातुश्री यशोदाबाई सोपानराव चितळे यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी दुःखद निधन झाले.गेल्या चार वर्षांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या.आज पहाटे त्यांचे अहिल्या नगर येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले.  

कणखर व शिस्त स्वभावाच्या म्हणून त्यांची ओळख होती.अत्यंत धार्मिक असलेल्या यशोदाबाई यांनी अनेक वर्ष पंढरपूरची आषाढी एकादशीची पायी वारी केली होती.केदारेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्या त्या सासुबाई होत्या.परिसरातील गरजूंच्या अडीअडचणीला त्या धावून जात होत्या. त्यांना कर्करोग असल्याचे निदान झाल्या नंतर त्यांनी जवळपास पस्तीस केमो घेतले होते.त्यांच्या मागे दोन मुले व एक मुलगी,नातू पणतू असा मोठा परिवार असून आज सायंकाळी पाच वाजता अहिल्या नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती स्व.चितळे यांचे नातु व केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे यांनी दिली

COMMENTS