Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदान रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी चुरशीने मतदान सुरु असतानाच कोल्हापूर शहरातील उत्तरेश्‍वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर वृद्ध मतदा

नववीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
गुजरातमध्ये 15 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू
नमाज अदा करीत असताना व्यक्तीचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी चुरशीने मतदान सुरु असतानाच कोल्हापूर शहरातील उत्तरेश्‍वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर वृद्ध मतदाराचा हृदयविवकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मतदान केंद्रामध्येच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या महादेव श्रीपती सुतार (वय 69, रा. उत्तरेश्‍वर पेठ, कोल्हापूर) याना मतदार रांगेमध्येच चक्कर आल्याने जागेवर कोसळले. यावेळी त्यांना नातेवाईकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

COMMENTS