Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील 264 उमेदवार रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छानन

राष्ट्रवादीच्या महिलांनी रस्त्यावर थापल्या भाकर ; महागाईचा केला अनोखा निषेध
कोपरगावचे डॉ. रामदास आव्हाड यांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार प्रदान
राष्ट्रवादीच्या तलवारी म्यान
This image has an empty alt attribute; its file name is download.jpg

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 37 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 264 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 27 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या हायहोल्टेज मतदारसंघात निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांमध्ये (अनुक्रमे नाव, पक्ष आणि चिन्ह या क्रमाने) : अयुब अमीन हुनगुंद (बहुजन समाज पार्टी, हत्ती), अ‍ॅड. उज्वल निकम (भारतीय जनता पार्टी, कमळ), गायकवाड वर्षा एकनाथ (इंडियन नॅशनल काँग्रेस, हात), अ‍ॅन्सन थॉमस (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर, द्राक्षे), कुर्बान शहादत हुसेन (राष्ट्रीय ओलमा कौन्सिल, बॅट), खान अब्बास अहमद (बहुजन महा पार्टी, शिट्टी), डॉ. (ड.) यशवंत रामभाऊ कसबे (भारतीय जनविकास आघाडी, कोट), रमजान अली चौधरी (ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन, पंतग), शौकत अब्दुल रफीक खान (इन्सानियत पार्टी, ऑटो रिक्षा), संतोष गणपत अंबुलगे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर), हयात्तुल्लाह अब्दुल्लाह शेख (अखिल भारतीय मुस्लिम लीग सेक्युलर, बॅटरी टॉर्च), हर्षदा बाबूराव जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी, रोड रोलर), अब्दुल ताहीर डव्होकेट (बबलू रजनीकांत, अपक्ष, काडेपेटी), अ‍ॅड. असिफ अली सिद्दीकी (अपक्ष, जहाज), ड. उत्तमकुमार नकुल सजनी साहू (अपक्ष, बासरी), इजाज मोहम्मद सफी खान (अपक्ष, डंबेल्स), डॉ. गफ्फार इब्राहिम सय्यद (अपक्ष, स्टेथोस्कोप), नजमाखतून मोहम्मद जफर खान (अपक्ष, कॅमेरा), नरेंद्र मिश्रा (अपक्ष, सफरचंद), अ‍ॅड. फिरोज शेख (अपक्ष, स्पॅनर), मुझाफर अली शेख (अपक्ष, चालण्याची काठी), मुश्ताक हैदर शेख (अपक्ष, हिरा), युनूसअली रशीद मुल्ला (अपक्ष, दूरध्वनी), रमा अरुण साबळे (अपक्ष, नागरिक), राजेश मोहन लोखंडे (अपक्ष, खाट), शांताराम स. दिघे (अपक्ष, प्रेशर कुकर), संदीप (भाऊ) रामचंद्र जाधव (अपक्ष, पेनाची निब, सात किरणांसह) यांचा समावेश आहे.

राज्यातील 13 मतदारसंघातील अंतिम उमेदवार – धुळे लोकसभा मतदारसंघात 18, दिंडोरी – 10 , नाशिक – 31, पालघर – 10, भिवंडी – 27, कल्याण – 28, ठाणे – 24, मुंबई उत्तर – 19, मुंबई उत्तर पश्‍चिम – 21, मुंबई उत्तर पूर्व  – 20, मुंबई उत्तर मध्य – 27, मुंबई दक्षिण मध्य – 15 आणि मुंबई दक्षिण –  14 अशी आहे. या 13 मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे.

COMMENTS