Homeताज्या बातम्या

संगमनेर ब्रँड बदनाम करण्याचा डाव : दुर्गा तांबे 

संगमनेर: निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी ऐतिहासिक थेट पाईप लाईन योजना पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. यामुळे शहरवासीयांना दररोज स्वच्छ व मुबलक पाणी मि

१३७ वर्षांचा इतिहास असलेल्या कर्जत उपकारागृहाला अखेर कुलूप !२७ आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी; पोलीस, न्यायालयासमोरील अडचणी वाढतील?
सोनईच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
‘अभाविप’च्या जिल्हा सहसंयोजक पदी काळे    
संगमनेर ब्रँड बदनाम करण्याचा डाव; निळवंडे पाईपलाईन चौकशीचे स्वागत – दुर्गाताई तांबे - महासंगम न्यूज

संगमनेर: निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी ऐतिहासिक थेट पाईप लाईन योजना पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. यामुळे शहरवासीयांना दररोज स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे. या योजनेला 2009 मध्ये नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन व जीवन प्राधिकरणसह सर्व विभागांच्या मंजुरी मिळाली आहे. 2009 च्या योजनेबाबत 2026 मध्ये अत्यंत खोटे व चुकीचे आरोप करून लोकप्रतिनिधी हे संगमनेर शहर व तालुक्याची राज्यात बदनामी करत आहे. या योजनेच्या चौकशीचे आम्ही स्वागत करत असून दूध का दूध और पानी का पानी होऊन खोटे आरोप करणारे तोंडघाशी पडतील, खरे तर नगरपालिका निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊन आरोप करत असल्याची  टीका माजी नगराध्यक्ष  दुर्गाताई तांबे यांनी केली आहे.संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी यांनी विधानसभेसारख्या पवित्र सभागृहामध्ये संगमनेरची बदनामी केल्याप्रकरणी   दुर्गाताई तांबे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर शहर हे विकसित व शांततेचे शहर आहे. या शहरातील वाढती लोकसंख्या गृहीत धरून निळवंडे धरणातून ऐतिहासिक थेट पाईपलाईन योजना राबविण्यात आली. आणि ही योजना अत्यंत यशस्वी ठरली आहे. त्यामुळे शहरातील सर्व जनतेला मुबलक व स्वच्छ पाणी दररोज मिळत आहे. सर्व विभागांच्या मंजुरी असल्याने कोणतेही चुकीचे काम झालेले नसून फक्त दिशाभूल करण्यासाठी नवीन लोकप्रतिनिधी हे आरोप करीत आहेत.

COMMENTS