Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सलमानच्या घरावर गोळीबार करणारा पाचवा आरोपी अटकेत

मुंबई ः बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एकाल

सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीवर रॉड आणि दगडांनी हल्ला
सलमान खान ची भाची बाॅलिवूडमध्ये करणार पदार्पण
9 वर्षांच्या कॅन्सर पीडित मुलाची सलमान खाननं घेतली भेट

मुंबई ः बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एकाला अटक केली आहे. या व्यक्तीला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. मोहम्मद चौधरी असे आरोपीचे नाव आहे. मोहम्मद चौधरीवर या प्रकरणात गोळीबार करणार्‍या गुन्हेगारांना मदत केल्याचा आरोप आहे. या व्यक्तीने विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन गुन्हेगारांना पैशाची मदत केली होती. त्यामुळे आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे.

COMMENTS