Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्रालयात मंत्र्यांसोबत आता एकाच व्यक्ती; गर्दी नियंत्रणाचा नवा फंडा

मुंबई : मंत्रालयात होणारी कार्यकर्त्यांची जत्रा आणि मंत्र्यांच्या मागे धावणारी पीएंची फौज या सगळ्याला चाप लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने मंत्रालय

पालघरसाठी स्वतंत्र जिल्हा बँक स्थापन करण्यास गती; मंत्रालयातील बैठकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश
पोहनेर सरपंच प्रकरणात अपात्रतेचे अपील नामंजूर; अ‍ॅड. सय्यद शाकेर यांच्या भक्कम युक्तिवाद
सातव्या वेतन आयोगाचा निर्णय महापालिकेच्या गळ्यात; व्याजापोटीच 3.43 कोटींचा अतिरिक्त भार
Mantralaya Crowd Control : मंत्रालयात नेत्यांच्या ‘गराड्याला’ आता चाप;  मुख्य सचिवांचा मोठा ‘ॲक्शन प्लॅन’

मुंबई : मंत्रालयात होणारी कार्यकर्त्यांची जत्रा आणि मंत्र्यांच्या मागे धावणारी पीएंची फौज या सगळ्याला चाप लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे मंत्रीमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जाणार आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबतचे कडक निर्बंध जारी केले आहेत. याबाबत सर्व मंत्र्यांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मंत्रीमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात जणू जत्रा भरलेली असते. मतदार संघातील प्रश्‍न, कार्यकर्त्यांची कामे आणि पदाधिकार्‍यांची लगबग यामुळे मंत्रालयाचा सहावा आणि सातवा मजला अक्षरशः गजबजलेला असतो. या गर्दीमुळे कामकाजात मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे निरीक्षण मुख्य सचिवांनी नोंदवले आहे. गर्दीला पांगवण्यासाठी सरकारने नियमावली कडक केली आहे. मंत्रीमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्र्यांसोबत त्यांच्या कार्यालयातील केवळ एकाच व्यक्तीला मंत्रीमंडळाच्या सभागृहापर्यंत एन्ट्री मिळेल. इतर पीए किंवा कार्यकर्त्यांना बाहेरच थांबावे लागेल. जर एखाद्या विशेष व्यक्तीला बैठकीला उपस्थित राहायचे असल्यास मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. त्याचे कागदपत्र सुरक्षा अधिकार्‍यांना दाखवल्याशिवाय आत पाऊल ठेवता येणार नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि सर्व बड्या सचिवांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत गांभीर्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्र्यांच्या अवतीभोवती घोटाळणार्‍या कार्यकर्त्यांच्या गराड्यामुळे अनेकदा महत्त्वाच्या फायलींची ने-आण करताना अडथळे येतात. आता या नव्या निर्णयामुळे मंत्रालयात ’फिल्डिंग’ लावणार्‍या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसणार आहे.

आमदार-खासदारांसाठीही नियमावली

जर बैठक ’सह्याद्री’ अतिथीगृहावर असेल, तर फक्त आमदार आणि खासदारांनाच वेटिंग रूममध्ये बसता येईल. त्यांच्या स्वीय सहायकांना परिसरात फिरण्यासही मनाई करण्यात आली आहे. मंत्रीमंडळ बैठकीच्या आधी आणि नंतर 2 तास सातव्या मजल्यावर किंवा मंत्रीमंडळ सभागृहात कोणतीही इतर बैठक घेता येणार नाही.

COMMENTS