Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’कॉर्पोरेट जिहाद’ची होणार चौकशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

नाशिक : नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये घडलेली घटना अंत्यत गंभीर आहे. ही घटना ‘कॉर्पोरेट जिहाद’मध्ये मोडते का? याची सरकार गांभीर्याने

बोरखेड येथे बेकायदेशीर वृक्षतोड; वनविभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप
मोडाल, तर पोलीस खाक्या दाखवणार-पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार
शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : घोगरे; आ.संजय गायकवाड, धिरेंद्र शास्त्री यांचा तीव्र निषेध
7 reasons why Devendra Fadnavis became Maharashtra CM again

नाशिक : नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये घडलेली घटना अंत्यत गंभीर आहे. ही घटना ‘कॉर्पोरेट जिहाद’मध्ये मोडते का? याची सरकार गांभीर्याने चौकशी करीत आहे. यंत्रणा या घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल तपास करीत आहेत. जर एखाद्या कटाचा पुरावा समोर आला, तर सरकार निर्णायक कारवाई करण्यास तयार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नाशिक टीसीएसमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची दखल घेतल्याबद्दल मी ‘टीसीएस’चे आभार मानतो. टीसीएसच्या प्रमुखांनी या घटनेचा निषेध केला असून, ते चौकशीत पोलिसांना सहकार्य करत आहेत. आम्हीही या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहोत.

धर्मांतर आणि छळाच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर ‘टीसीएस’ने आपल्या नाशिक शाखेतील कर्मचार्‍यांना सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून घरून काम करण्यास सांगितले आहे. तपासादरम्यान पोलीस अधिकार्‍यांनी संशयित आरोपींमध्ये झालेले सुमारे 78 संशयास्पद फोन कॉल रेकॉर्ड, ई-मेल आणि चॅट्स जप्त केले आहेत. पोलिसांना संभाव्य आर्थिक व्यवहारांचेही पुरावे मिळाले आहेत. एकूण नऊ गुन्हे दाखल केले असून, एक गुन्हा देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आणि उर्वरित आठ गुन्हे मुंबई नाका येथे दाखल केले आहेत.

नाशिक ‘टीसीएस’ प्रकरणात निदा खानचे प्रतिनिधित्व करणारे अ‍ॅड. बाबा सय्यद यांनी सांगितले की, त्यांच्या अशिलावर धर्मांतर किंवा छळाचे कोणतेही आरोप नाहीत. धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली निदा खानचे नाव ‘एफआयआर’मध्ये नोंदवण्यात आले आहे. निदा खान ‘टीसीएस’मध्ये एचआर मॅनेजर नव्हती, तर ती प्रोसेस असोसिएट म्हणून काम करत होती. पहिल्या तक्रारीत बलात्कार आणि धार्मिक भावना दुखावण्याच्या गुन्ह्यांशी संबंधित कलमे होती. दानिश शेखला मुख्य आरोपी करण्यात आले असून निदा खान आणि अत्तार हे सहआरोपी आहेत. पोलिस तपासात इतर बेकायदेशीर कृत्ये उघडकीस आली आणि आठ एफआयआर दाखल करण्यात आले. इतर ‘एफआयआर’मध्ये जबरदस्तीने धर्मांतराचा उल्लेख नाही, केवळ धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार आहे. दोन आरोपी पोलिस कोठडीत आहेत.

COMMENTS