बीड : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील प्रसिद्ध श्री रंगनाथ महाराज संस्थानास बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनावणे यांनी सदिच्छ

बीड : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील प्रसिद्ध श्री रंगनाथ महाराज संस्थानास बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनावणे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे परिसरातील भाविक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, गेवराई तालुकाध्यक्ष अण्णासाहेब राठोड, शहराध्यक्ष राजेंद्र मोटे, जिल्हा परिषद सदस्य बप्पासाहेब अण्णा तळेकर आणि शफिक भाई भोपळे काका यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. कृष्णा महाराज यांच्या हस्ते खासदार सोनावणे व इतर मान्यवरांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
या भेटीदरम्यान संस्थानच्या विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. श्री रंगनाथ महाराज संस्थानच्या वतीने भाविकांच्या सुविधेसाठी भव्य सभामंडप उभारणीसाठी आवश्यक असलेल्या निधी व मागणीचे पत्र खासदार सोनावणे यांना सुपूर्द करण्यात आले. या मागणीबाबत अत्यंत सकारात्मक विचार करून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन खासदारांनी दिले. या भेटीमुळे आता संस्थानच्या रखडलेल्या विकासकामांना गती मिळेल, अशी आशा मादळमोही पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS