Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

बसवेश्वरांच्या विचारांनी समाजात समता रुजवली : आ.मोनिका राजळे

पाथर्डी : बसवेश्वर यांच्या विचारांनी समाजात समतेची भावना रुजवली. जातीभेद निर्मूलनासाठी त्यांनी मोठे कार्य केले. महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या विचारांची सतत आठवण राहावी, या उद्देशाने या रस्त्याला ‘महात्मा बसवेश्वर मार्ग’ असे नामकरण करण्यात आले आहे असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केले. शहरातील नाईक चौक ते उपजिल्हा रुग्णालय या  रस्त्याचे महात्मा बसवेश्वर मार्ग असे नामकरण करण्यात आले असून या रस्त्यावर लावलेल्या नामफलकाचे अनावरण करताना त्या बोलत होत्या.  यावेळी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, नंदकुमार शेळके, बंडू पाटील बोरुडे, अमोल गर्जे, संतोष जिरेसाळ, अभिजीत गुजर, भैय्या इजारे, ऍड. प्रतीक खेडकर, सुभाष बोरुडे, संजय देशमुख, डॉ. जगदीश मुने, भैय्या नागरे, मनिषा उदमले,अजय भंडारी, संजय भागवत, सोमनाथ टेके, अजिनाथ मोरे,दत्ता टेंभुरकर, किशोर परदेशी, बबलू खोर्दे, मंजू फुटाणे, अशोक मंत्री, हुमायून आतार, सचिन साखरे, प्रथमेश नाकील, दयानंद जिरेसाळ, संतोष बुरसे, रेणुका फुलशेटे,स्वाती चंदनकर हे  उपस्थित होते. नगराध्यक्ष आव्हाड म्हणाले की, आमदार राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली या नामफलकाचे आकर्षक स्मारक उभारून परिसराचे सुशोभीकरण करण्यात येईल. प्रास्ताविक संतोष जिरेसाळ, सूत्रसंचालन अभिजीत गुजर तर आभार भैय्या इजारे यांनी मानले.

माजी आ.नरेंद्र घुले यांनी घेतली दुकळे कुटुंबाची भेट; शोकग्रस्त परिवाराचे केले सांत्वन
‘कलेक्टर साहेब, ड्रममध्ये डिझेल द्या!’ नियम बदला आणि शेतकऱ्यांची खोळंबलेली मशागतीची कामे वाचवा; रामनाथ राजपुरे यांची मागणी!
कोपरगाव शहरात नालेसफाई मोहिमेस प्रारंभ

पाथर्डी : बसवेश्वर यांच्या विचारांनी समाजात समतेची भावना रुजवली. जातीभेद निर्मूलनासाठी त्यांनी मोठे कार्य केले. महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या विचारांची सतत आठवण राहावी, या उद्देशाने या रस्त्याला ‘महात्मा बसवेश्वर मार्ग’ असे नामकरण करण्यात आले आहे असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केले.

शहरातील नाईक चौक ते उपजिल्हा रुग्णालय या  रस्त्याचे महात्मा बसवेश्वर मार्ग असे नामकरण करण्यात आले असून या रस्त्यावर लावलेल्या नामफलकाचे अनावरण करताना त्या बोलत होत्या.  यावेळी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, नंदकुमार शेळके, बंडू पाटील बोरुडे, अमोल गर्जे, संतोष जिरेसाळ, अभिजीत गुजर, भैय्या इजारे, ऍड. प्रतीक खेडकर, सुभाष बोरुडे, संजय देशमुख, डॉ. जगदीश मुने, भैय्या नागरे, मनिषा उदमले,अजय भंडारी, संजय भागवत, सोमनाथ टेके, अजिनाथ मोरे,दत्ता टेंभुरकर, किशोर परदेशी, बबलू खोर्दे, मंजू फुटाणे, अशोक मंत्री, हुमायून आतार, सचिन साखरे, प्रथमेश नाकील, दयानंद जिरेसाळ, संतोष बुरसे, रेणुका फुलशेटे,स्वाती चंदनकर हे  उपस्थित होते.

नगराध्यक्ष आव्हाड म्हणाले की, आमदार राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली या नामफलकाचे आकर्षक स्मारक उभारून परिसराचे सुशोभीकरण करण्यात येईल. प्रास्ताविक संतोष जिरेसाळ, सूत्रसंचालन अभिजीत गुजर तर आभार भैय्या इजारे यांनी मानले.

COMMENTS