Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचा इस्लामपूर बाजार समितीवर 17-1 ने दणदणीत विजय

इस्लामपूर : निकालानंतर विजयी उमेदवार अनिल पावणे व संजय लाखे विजयाची खुण करत आनंदोत्सव करताना इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजा

एसटीच्या संपप्रश्‍नी खा. शरद पवार यांची मध्यस्थी?
थकबाकीपोटी महावितरणच्या सबस्टेशनला मसूर ग्रामपंचायतीने सिल ठोकताच पाणी पुरवठा सुरळीत
पांचगणी पालिका मुख्याधिकार्‍यांच्या अंगावर काळा रंग टाकून हल्ला

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित राजारामबापू पाटील शेतकरी विकास पॅनेलने विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनेलचा 17-1 ने धुव्वा उडवत बाजार समितीवर झेंडा फडकवला. तर हमाल गटात विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनेलचे संजय दाजी लाखे हे विजयी झाले. सुमारे 850 ते 900 च्या फरकाने उमेदवार विजयी झाले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आ. मानसिंगराव नाईक, आष्ट्याचे युवा नेते वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू पाटील शेतकरी विकास पॅनेल तर विरोधी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, युवा नेते सम्राट महाडिक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, युवा नेते वैभव पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी परिवर्तन पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
यामध्ये सहकारी संस्था गट सर्वसाधारण मतदार संघाततून राजारामबापू शेतकरी पॅनेलचे विजयी उमेदवार शिवाजी वसंत आपुगडे, अशोक बाबुराव पाटील, चंद्रकांत हिंदूराव पाटील, विश्‍वासराव सपंतराव पाटील, संपतराव जयकरराव पाटील, संदीप संपतराव पाटील, शंकर सिताराम मोहिते. महिला मतदार संघ अपर्णा शिवाजी ढोले, सुवर्णा तानाजी साळुंखे. इतर मागास प्रवर्ग संघ विलास यशवंत देसावळे. भ. वि. जा. /ज मतदासंघ विकास शामराव नांगरे. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ अल्लाउद्दीन हाशमुद्दीन चौगुले, आबासाहेब आनंदराव पाटील. अनु. जाती / जमाती मतदार संघ -महेश सर्जेराव भोपळे. आर्थिक दुबर्ल मतदार संघ जितेंद्र बाबासो पाटील, आडते व व्यापारी मतदार संघ जालिंदर गुरूलिंंग इंगळे, अनिल शंकर पावणे हे उमेदवार विजयी झाले. तसेच विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनेलचे उमेदवार हमाल व तोलाईदार मतदारसंघातून संजय दाजी लाखे यांनी 117 मते मिळवत विजय संपादन केला.
लाखात एक लाखे
सत्ताधार्‍यांच्या प्रबळ गटात हमाल तोलाईदार गटातील संजय लाखे यांनी निसटता विजय मिळवला. या यशामुळे विरोधी समर्थकांच्यात उत्साह संचारला आहे . लाखात एक लाखे.. यांचा विजय लक्षवेधी ठरला.

माजी संचालक विजय कुंभार यांनी कोल्हाटी समाजाला भविष्यात संधी मिळावी. यासाठी 75 मते बाजार समितीला लावली. त्यांचा फायदा या निवडणुकीत झाला असल्याची भावना नूतन संचालक संजय लाखे यांनी व्यक्त केली.

COMMENTS