Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धारेश्‍वर दिवशी येथे गाईचे ढोहाळे जेवन कार्यक्रम थाटामाटात

धारेश्‍वर दिवशी : गायीचे औक्षण करताना महिला. पाटण / प्रतिनिधी : कुणी तरी येणार येणार गं’ म्हणत डोहाळे जेवण भरवले जात असते. पण जर हेच डोहाळे जेवण ए

राष्ट्रपती रायगड दौर्‍यानिमित्त हेलिपॅडला विरोध झाल्याने राष्ट्रपती गडावर ’रोप वे’ ने जाणार
एसटी बसद्वारे आषाढीसाठी मानाच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थानl LokNews24
लोणंद येथे शिवजयंती दिनी श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान; इतिहास संशोधकाच्या शब्दांची धार पुन्हा गरजणार

पाटण / प्रतिनिधी : कुणी तरी येणार येणार गं’ म्हणत डोहाळे जेवण भरवले जात असते. पण जर हेच डोहाळे जेवण एखाद्या गायीचे असेल तर..! पाटण तालुक्यातील धारेश्‍वर दिवशी येथील एका कुटुंबाने आपल्या लाडाच्या गायीचे मोठ्या थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला. त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
कुणावर किती प्रेम असेल, तसे सांगणे अवघड आहे. कारण पाटण तालुक्यातील धारेश्‍वर दिवशी येथील एका गाय प्रेमीने आपल्या गाईचे चक्क डोहाळे जेवण घातले. हे डोहाळे जेवण काही साधं-सुधा नव्हतं. तर अगदी झकास होते. गाईला सजवण्यापासून मेजवानीसाठी पंचपक्वान्नांचा रेलचेल, मंडप, वाजंत्री, आहेर-माहेर असे सर्व काही करण्यात आले. हा सोहळा अगदी एखाद्या सुवासिनीच्या ओटीभरणीपेक्षाही दिमाखदार होता.
पाटण तालुक्यातील केरा विभागातील धारेश्‍वर दिवशी गावचे सामान्य शेतकरी प्रकाश दुधाजीराव साळुंखे यांची गोमाता पहिल्यांदा गाबन राहिली तिचा सातवा महिना असल्याने साळुंखे कुटुंबातील सर्वांनी ठरवले की आपण गोमातेचे ओटी भरणे (ढवाळ जेवन) घालू आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी गावांतील सुहासिनी महिलांना बोलावून ओठी भरण्याचा कार्यक्रम केला. संपूर्ण गावाला मिस्ट अन्नाचे पोटभर जेवण दिले. साळुंखे हे कुटूंब बिगरशेतीचे आहे दुसर्‍याची शेती करुण गुजरान करत आहेत, हि गाय सहा महिन्यांची असताना कुणीतरी सोडलेले वासरु होते. ते वासरु बर्‍याच घरांमध्ये गेले पण कुणी ही वासराला ठेवले नाही. पण पशुप्रेमी, मायाळू स्वभावाच्या प्रकाश साळुंखे यांनी या गोंडस वासराला घरात घेऊन पोटच्या गोळ्यप्रमाणे संभाळले. तीचे माई असे नाव ठेवले.
गर्भवती महिलेच्या पोटातल्या बाळावर गर्भसंस्कार पार पडावेत. म्हणून गर्भवती महिलांची ओटी भरणे अर्थात डोहाळे जेवण कार्यक्रम आयोजित करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आता ही प्रथा प्राण्यांच्या बाबतीत अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण पाटण तालुक्यातील धारेश्‍वर दिवशी येथील पार पडलेले, एका गायीचे डोहाळे जेवण सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे. कारण एखाद्या सुवासिनीचा डोहाळे जेवणाला लाजवेल अशा थाटात गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पाडला. कुटुंबाचे त्यांच्याकडे असणार्‍यांनी गाई-बैलांवर जीवापाड प्रेम आहे. प्रकाश साळुंके यांचे गायीवर खुप प्रेम आहे. अगदी तिच्या आंघोळीपासून सर्व गोष्टींची काळजी साळुंखे कुटुंब स्वतः घेतात. गाईवर नितांत प्रेम असणार्‍या प्रकाश यांच्या गाईला सध्या दिवस गेले असून सातवा महिना सुरू आहे. महिलांची जशी ओटी भरणी होते. त्यापध्दतीने प्रकाश साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबांनी आपल्या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा बेत आखला. त्यासाठी कपिला आली आमच्या घरी ढोहाळे पुरवावे माझे असे कार्यक्रमाचे नाव देऊन मित्र परिवार व आप्तेष्टांना निमंत्रण धाडले. दारात मंडप घालून पंचपक्वान्न आणि आहेर-माहेर… अगदी त्यांनी आपल्या गाईला या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमा निमित्ताने छान सजवले. शिंग्या शेंब्या, पासूनपायापर्यंत फुलांच्यापासून तिच्या अंगावर मखमली झुला, साड्या, कंकण अशा पध्दतीचे वेशभूषा करण्यात आली. उपस्थितांना जेवन, गाईचे औक्षण आणि सर्व विधी देखील अगदी दिमाखात पार पडले. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात गावातील प्रमुख मंडळींची उपस्थिती होती. खरं तर असं म्हणतात की हौसेला मोल नसते. प्रकाश साळुंखे व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळ जेवणाच्या निमित्ताने केलेला कार्यक्रम त्याचे उदाहरण म्हणावे लागेल.

COMMENTS