Homeताज्या बातम्यासंपादकीय

खडसेंची राजकीय गोची

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोमात सुरू असून, पहिल्या टप्प्यातील मतदान पार देखील पडले असून, दुसर्‍या टप्यातील मतदानासाठी काही दिवसांचा अवधी उरला आह

फसवणुकीचा गोरखधंदा  
एक देश, एक निवडणुकीवर प्रश्‍नचिन्ह
महायुतीमध्ये जागावाटपावरून ठिणगी

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोमात सुरू असून, पहिल्या टप्प्यातील मतदान पार देखील पडले असून, दुसर्‍या टप्यातील मतदानासाठी काही दिवसांचा अवधी उरला आहे. मात्र या राजकारणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा भाजपप्रवेश रखडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खडसेंचा भाजपप्रवेश न झाल्यास खडसेंची राजकीय गोची होण्याची शक्यता आहे. कारण शरद पवारांचा विश्‍वास गमावून बसले असून, आता 15 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील भाजपमध्ये प्रवेश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता राजकारणामध्ये काही गोष्टींना मुरड घालावी लागते. खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांकडून काही बाबी शिकून घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले तरी, फडणवीसांनी वरिष्ठांचा आदेश मानून ते पद स्वीकारले. यातून केंद्रातून फडणीवासांना योग्य संदेश दिला असेही बोलले जात होते. मात्र तरीही मनाची इच्छा नसतांना केवळ वरिष्ठांच्या आदेशामुळे फडणवीसांनी ते पद स्वीकारले. तर दुसरीकडे खडसे नेहमीच स्पष्टवक्तेपणा ठेवून इतरांची नाराजी ओढवून घेतांना दिसून येतात. खरंतर काँगे्रसला सोडचिठ्ठी देण्याअगोदर अशोक चव्हाण काही तास अगोदर काँगे्रसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजर होते. मात्र तरीही उद्या आपण भाजपमध्ये जाणार आहोत याची थोडीशीही भणक त्यांनी आपल्या जवळच्यांना लागू दिली नाही. मात्र याउलट खडसे यांचे आहे.

खडसे राजधानीत गेल्यानंतर त्यांनी भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात परतल्यानंतर खडसे यांनी जळगावमध्ये पत्रकार परिषद घेत आपण पुढील 15 दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. शिवाय राजधानी दिल्लीमध्ये आपला भाजप प्रवेश होणार असल्याचे खडसे यांनी म्हटले. मात्र आजमितीस 15 दिवसांचा कालावधी उलटूनही त्यांचा भाजप प्रवेश झालेला नाही. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर देखील खडसे यांचा भाजप प्रवेश होतो की नाही, याचे उत्तर काळच देणार आहे. कारण खडसे यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक नेत्यांचा विरोध होतांना दिसून येत आहे,  की तो मुद्दाम केला जात आहे. मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की, खडसे यांच्या भाजप प्रवेशाला जळगावमधील स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना एकनाथ खडसे यांची मदत घ्यायची आहे.

पण राज्यातील नेत्यांना खडसे आपल्या पक्षामध्ये नको आहेत. त्यामुळे खडसेंनी भाजपश्रेष्ठींची भेट घेतल्याची बातमी फुटताच त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे खडसे पुन्हा भाजपमध्ये आल्यास पक्षाचा काहीच फायदा होणार नाही उलट नुकसानच जास्त होईल असा निरोप पाठवला आहे. यामुळे खडसे यांचा भाजप प्रवेश लांबल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडणूक संपल्यानंतर खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे खडसे यांना राज्यातील भाजप नेत्यांशी जुळवून घ्यावे लागणार आहे, तरच त्यांचा भाजपप्रवेश सुकर होणार असल्याचे दिसून येत आहे. यासाठी खडसे यांनी आपल्या आक्रमक स्वभावाला मुरड घालण्याची गरज आहे. खरंतर खडसे यांची राजकीय कारकीर्द संपल्यागत जमा आहे. कारण खडसे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि लोकसभा निवडणुका झाल्यानंतर त्यांची वर्णी राज्यपालपदी लागणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे खडसे राज्यपाल झाल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला बे्रक लागणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र खडसे आपली कन्येच्या राजकीय कारकीर्दीची चिंता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खडसे त्यांच्या कन्येला आमदारकीच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात स्थिरावू देण्यास इच्छूक असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS