Homeताज्या बातम्यादेश

चिट्ठी लिहून विद्यार्थिनीची आत्महत्या

राजस्थान प्रतिनिधी - आगामी काळात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील व

मुलांना विष देत जोडप्याची आत्महत्या
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.
हिंगोलीत शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

राजस्थान प्रतिनिधी – आगामी काळात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून संवाद साधला. त्यात पीएम मोदींनी विद्यार्थ्यांना ताणतणाव न घेण्याचा सल्ला दिला. या चर्चेत पंतप्रधान विद्यार्थी आणि पालकांना सल्ला देत असतानाच राजस्थानमधील कोटा शहरातून आणखी एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कोटा येथे जेईई मेनची तयारी करत असलेली विद्यार्थिनी निहारिका सिंहने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

जेईई मेन्सचा पेपर आज 30 जानेवारीला होणार होता. त्याआधीच तिनं हे पाऊल उचललं आहे. ही घटना बोरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. निहारिकाच्या खोलीत एक सुसाईड नोट देखील सापडली आहे, त्यात तिने लिहिलंय की, आई-बाबा मला माफ करा, मी जेईईची तयारी करु शकले नाही, त्यामुळेच मी हे पाऊल उचलत आहे. बोरखेडा पोलीस ठाण्याचे एएसआय रेवतीरामन यांनी सांगितले की, शिवमंदिर 120 फूट रोड बोरखेडा येथील रहिवासी विजय सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांची मुलगी निहारिका ही 18 वर्षांची होती. बारावीत शिकत होती. तिचा जेईई ॲडव्हान्सचा पेपर आज मंगळवारी (दि.30) होणार होता. त्याआधीच तिने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

COMMENTS