Homeताज्या बातम्यामनोरंजन

अनुष्का-विराट दुसऱ्यांदा आई-बाबा होणार ?

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहली हे बॉलिवूडपासून ते क्रिकेट जगतातील प्रसिद्ध

मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले ः मुख्यमंत्री शिंदे
Dhule : गावाजवळील नाल्यात ट्रक चालकाने टाकले घातक विषारी रसायन (Video)
नवी मुंबई पोलिसांचा दणका


मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहली हे बॉलिवूडपासून ते क्रिकेट जगतातील प्रसिद्ध स्टार कपलपैकी एक आहे. हे कपल सर्वांचे आवडते कपल असून सोशल मीडियावर त्यांची नेहमीच चर्चात होत असते. हे कपल खूपच वेगळे आहेत. त्यांना त्यांचे वैयक्तिक आयुष्य सर्वांसमोर शेअर करायला फार आवडत नाही. त्यामुळे ते कॅमेऱ्यासमोर आणि मीडियासमोर येणं टाळतात. अशामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रग्नेंट असल्याची चर्चा सुरू आहे. पण या कपलने या चर्चांचे खंडन केले होते. पण आता अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये अनुष्काचा बेबीबंप दिसत आहे. हे पाहून दोघांचेही चाहते आनंदी झाले आहेत. अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अनुष्काचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर येत होते. हे फोटो आणि व्हिडीओमधून हेच दिसत होते की अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे. पण या कपलने अधिकृत घोषणा केली नाही. त्याचसोबत त्यांनी प्रग्नेंसीचे वृत्त खोटं असल्याचे सांगितले होते. पण अशामध्ये आता 9 नोव्हेंबर रोजी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेत्री आई होणार असल्याची दिसत आहे. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर दोघांच्याही चाहत्यांनी जोरदार कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. १९ नोव्हेंबर रोजी एका सोशल मीडिया यूजरने अनुष्का शर्माचा पती विराट कोहलीसोबतचा एक व्हिडिओ Reddit वर शेअर केला होता. व्हिडीओमध्ये, हॉटेलमध्ये येताना अभिनेत्री सावधपणे पोटावर हात लावून चालत असताना दिसत आहे. अनुष्का विराटचा हात पकडून हळूहळू चालत असल्याचे दिसत आहे. अनुष्काने बलून स्लीव्सवाला ओवरसाइज्ड शिफ्ली ड्रेस घातला आहे. कंफर्टेबल राहण्यासाठी तिने तिचा ड्रेस ब्लॅक स्टॅपी फ्लॅटने स्टाईल केला आहे. लाईट मेकअप आणि मोकळे केस सोडत अनुष्काने आपला लूक परिपूर्ण केला होता. या लूकमध्ये ती क्यूट दिसत आहे.पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, चाहते एका व्हायरल व्हिडिओबद्दल खूप उत्सुक दिसत आहेत. ज्यामध्ये अनुष्का नुकताच विराटसोबत बंगळुरूमध्ये तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट कोहली आउटिंग दरम्यान हातात हात घालून फिरताना • दिसत आहेत. अनुष्का आणि विराटच्या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्माला पाहून नेटिझन्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. अभिनेत्री प्रग्नेंट असल्याचा दावा ते करत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘बाळ होणार आहे का?” दुसऱ्या युजरने कमेंट केली की, ‘100 टक्के प्रग्नेंट आहे. तिसऱ्या युजरने लिहिले, ‘अरे.. अनुष्का आधीच प्रेग्नंट आहे. मी इतकी लहान आहे की माझ्या गरोदरपणात मी पेंग्विनसारखी दिसत होती. तर एका नेटिझनने विराट आणि अनुष्काने त्यांच्या प्रेग्नेंसीची घोषणा कशी केली नाही याचे कौतुक केले.

COMMENTS