Homeताज्या बातम्यामनोरंजन

नव्या गौतमीने मार्केट केलं जाम दिसायला अगदी सेम टू सेम

डान्सर गौतमी पाटीलने तिच्या नृत्याने प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत. गौतमी पाटीलने तिच्या अदा आणि डान्सने शहर आणि खेड्यांमधील तरुणांना वेड लावलं आह

नगर-मनमाड महामार्गावरील भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू | DAINIK LOKMANTHAN
उत्तर प्रदेशातील मुस्लिम धर्मगुरुंवर केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित
गावठी हातभट्टी विक्री करणार्‍यांवर कारवाई

डान्सर गौतमी पाटीलने तिच्या नृत्याने प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत. गौतमी पाटीलने तिच्या अदा आणि डान्सने शहर आणि खेड्यांमधील तरुणांना वेड लावलं आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या मराठी सेलिब्रिटीमध्ये गौतमीचे नाव घेतलं जात आहे. याचदरम्यान, गौतमी सारख्या दिसणाऱ्या एका नव्या डान्सरने नृत्य क्षेत्रात एन्ट्री केली आहे. ही नवीन डान्सर दिसायला सेम टू सेम गौतमी सारखीच आहे. गौतमी पाटील सारख्या दिसणाऱ्या डान्सरने फार कमी कालावधित मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. गौतमीची ‘डुप्लिकेट कॉपी’ गौतमी पाटीलने ‘माझा कारभार सोपा नसतोय रं’, ‘दिलाचं पाखरू’, ‘सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम’, ‘पाटलांचा बैलगाडा’ या गाण्यांतून तरुणाईच्या मनावर गारुड निर्माण केलं आहे. याच अनेकांच्या ‘दिलो की धडकन’ असणाऱ्या गौतमीची ‘डुप्लिकेट कॉपी’ मार्केटमध्ये आली आहे. गौतमी सारखी दिसणारी डान्सर गौतमी पाटील सारख्या दिसणाऱ्या डान्सरचं नाव आहे तनुश्री पुणेकर. तनुश्री ही लावणी कलाकार आहे. तनुश्री हुबेहूब गौतमी सारखी दिसते. तनुश्री फक्त गौतमी सारखी दिसत नाही, तर डान्स, अदाकारी, बोलणं अशा अनेक गोष्टी गौतमी सारख्या आहेत. गौतमी सारखा तनुश्रीचाही राज्यभरात मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमालाही मोठा चाहता वर्ग हजेरी लावतो. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होते. तनुश्रीसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची झुंबड पाहायला मिळते. मला गौतमी म्हणू नका : तनुश्री पुणेकर गौतमी सारख्या दिसणाऱ्या तनुश्रीला मात्र चाहत्यांनी ‘डुप्लिकेट गौतमी’ बोललेले अजिबात आवडत नाही. तिने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना मनातील गोष्ट सांगितली. तनुश्री म्हणाली की, ‘सर्वांना विनंती आहे की, मला कुणीही गौतमी पाटील म्हणू नका. तसेच कोणीही ‘डुप्लिकेट गौतमी’ म्हणू नका. मी तनुश्री पुणेकर आहे. त्यामुळे मला तनुश्री पुणेकरच म्हणा. सर्वांच्या प्रेमाबद्दल आभारी आहे. असंच प्रेम देत राहा. धन्यवाद’. गौतमी पाटीलचं मार्केट डाऊन होणार? तत्पूर्वी, तनुश्रीला पाहण्यासाठी कधी कधी तर राडा सुद्धा होतो. आता तनुश्रीच्या एन्ट्रीने गौतमी पाटीलचं मार्केट डाऊन तर होणार नाही ना हे पाहावं लागेल.

COMMENTS