Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरडगावचा अर्धवटराव अखेर भुईसपाट

तरडगाव : अर्धवट पूल पाडल्यानंतर रिकामा झालेला बसस्थानक परिसर. (छाया : सुशिल गायकवाड) तरडगाव / वार्ताहर : मी तरडगावचा अर्धवटराव बोलतोय हा विषय घेऊन

कायद्याच्या अंतिम वर्षाच्या अखेरच्या सत्रातील एक पेपर रद्द; शिवाजी विद्यापीठाचा निर्णय ; विद्यार्थ्यांना दुसर्‍यांदा द्यावी लागणार परिक्षा
पेठ नाक्यावर सोळा लाखांचे कोकेन पकडले; नायजेरियन तरुणाची पोलीस कोठडीत रवानगी
नाशिक मंडळामध्ये वीजचोरीविरुद्ध मोहीम एकाच दिवसात २६१ जणांवर कारवाई

तरडगाव / वार्ताहर : मी तरडगावचा अर्धवटराव बोलतोय हा विषय घेऊन तरडगावच्या अर्धवट पुलासंदर्भात दैनिक लोकमंथनच्या माध्यमातून लिहिण्यात आले होते. गेली अनेक वर्षापासून हा अर्धवट पुल डोळ्यासमोर दिसत असताना ह्या अर्धवट पुलाचे पुढे होणार तरी काय? हा अर्धवट पूल पूर्ण होणार की पाडण्यात येणार? अजूनही हा असाच का? कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या पुलाचे पुढे काय होणार? यांसारखे अनेक प्रश्‍न उपस्थित राहिले होते.
सरकारी काम बारा महिने थांब असे म्हणत असताना अखेर काही महिने नव्हे तर तब्बल 12 वर्षांनंतर या पुलाबाबत निर्णय कृतीतून पुढे आला. हे अजून असेच आहे का? याचे बांधकाम कधी पूर्ण होणार या पुलाबाबत नेहमी प्रश्‍न उपस्थित होत राहिले. अखेर या प्रश्‍नांना पूर्णविराम मिळालेला असून करोडो रुपये खर्च करून बांधलेला अर्धवट पूल अखेर भुईसपाट करण्यात आला. पूर्वी तरडगावच्या बसस्थानक परिसरात पूर्वीचा रस्ता जसा दिसत होता तो अर्धवट पूल पाडल्याने जैसे थे जाग्यावरच पूल बांधण्याच्या अगोदर जशी परिस्थिती होती तशीच झाली आहे.
लोणंद ते फलटण मार्गातील रस्त्याची कामे वेगाने होत असताना तरडगाव, ता. फलटण येथील अर्धवट स्वरूपात असलेल्या पुलाकडे ही सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले होते. कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा चुराडा झाला असून अखेर हा अर्धवट पूल पाडण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे अर्धवट स्वरूपात असणारा हा पूल येथून ये-जा करणार्‍या गाड्यांसाठी धोकादायक तर झाला होता. शिवाय या परिसरातून लांब लचक ऊसाची ट्रॉली कधी-कधी अर्धवट पुलाला वळसा घालून जाताना मोठी कसरत होत होती. अर्धवट पूल गाडी पार्किंगपासून ते उद्योग धंद्यासाठी तसेच लोकांना गप्पा मारण्यासाठी चांगला उपयोगी ठरला होता. आज अर्धवट पूल पाडत असताना मशिनचा येणारा आवाज आता अर्धवट पूल पडत असल्याची जाणीव कानांना करून देत होता.
अर्धवट पूलाच्या अलीकडे आणि पलीकडे दोन्ही बाजूला शाळा असल्याने हा पूल नेहमीच धोकादायक वाटत असायचा. परंतु या परिसरात कोणतीही दुर्घटना घडली नाही. कोणतीही जीवितहानी या परिसरात कधीच घडली नाही. हे आपल्या सर्वांच्या दृष्टिने चांगली गोष्ट होती. मोठ्या प्रमाणात या मार्गातून मोठी वाहतूक होत असताना असा अर्धवट पूल असणे तसेही धोक्याचे होऊन बसलेले होते. परंतू या पुलाने ही अनेकांना आधार दिला आहे. पुलाखाली भेटुयात म्हणून अनेकांनी इथे भेट घेत पुढील दिशा ही ठरविल्या असतील. विविध कार्यक्रमाचे फ्लेक्स तसेच महामानवाच्या जयंतीचे फ्लेक्स ही याच पुलाचा आधार घेत होते. अनेक वर्ष ऊन वारा पाऊस यांपासून या अर्धवट पुलाने नागरिकांना संरक्षण देण्याचे काम केले. हा अर्धवट पूल लोकांसाठी आडोसा घेण्यासाठी ही उपयुक्त ठरत होता. आज हा पूल पाडण्यात आला असला तरी जनहिताच्या दृष्टीने जे योग्य आहे तेच निर्णय घेऊन कृतीत आणावे लागतात. गेली अनेक वर्षे अर्धवट स्वरूपात असलेल्या पुलाबाबत निर्णय घेतल्यने नागरिकांमध्ये समाधानाची भावना दिसली.

COMMENTS