Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुक्त विद्यापीठाचे सन – 2022 चे विशाखा काव्य पुरस्कार जाहीर

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे देण्यात येणारे 'विशाखा काव्य पुरस्कार - 2022' जाहीर करण्या

परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदणीसाठी वेब portal विकसित
स्मार्ट मीटरमुळे ग्राहक सेवेचा दर्जा वाढणार : विजय सिंघल
राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न मार्गी : आ. रोहित पवार | पहा ‘आपलं अहमदनगर’ | LokNews24

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे देण्यात येणारे ‘विशाखा काव्य पुरस्कार – 2022’ जाहीर करण्यात आले आहेत. नवोदित कवीच्या पहिल्या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार देण्यात येतो. 

या पुरस्कारासाठी गठीत करण्यात आलेल्या अंतिम निवड समितीची बैठक नुकतीच विद्यापीठात संपन्न झाली. या समितीने प्राथमिक निवड समितीमार्फत निवडलेल्या निवडक काव्यसंग्रहांचे परीक्षण व मूल्यमापन करून खालीलप्रमाणे विजेते जाहीर केले आहेत:-

• प्रथम पुरस्कार : कवी तेजस मोडक, पुणे (काव्यसंग्रह – तृष्णाकर्ष)

• द्वितीय पुरस्कार : कवी रमजान मुल्ला, पलूस, सांगली (काव्यसंग्रह – अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत)

• तृतीय पुरस्कार (विभागून) : 1. कवी मेघराज मेश्राम, नागपूर (काव्यसंग्रह – माणूस असण्याच्या नोंदी)

    2. कवी विवेक काटीकर, पुणे (काव्यसंग्रह – दिक्काल धुकं पसरलेलं सर्वत्र) 

अंतिम निवड समितीमध्ये जेष्ठ कवी श्री. नारायण लाळे (डोंबिवली), श्रीमती अंजली ढमाळ (पुणे), श्री.

समाधान महाजन (नाशिक), डॉ. रामचंद्र काळुंखे (छत्रपती संभाजीनगर) आणि मागील वर्षाच्या विशाखा काव्य पुरस्काराचे प्रथम क्रमांकाचे विजेते श्री. अक्षय शिंपी, (मुंबई) यांचा समावेश होता.

पुरस्कार वितरणाचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, प्रभारी कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख आणि कुसुमाग्रज अध्यासनाचे समन्वयक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी विशाखा काव्य पुरस्कार प्राप्त कवींचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS