Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार निलेश लंकेच्या आंदोलनास पाथर्डीत संमिश्र प्रतिसाद

भाजप वगळता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बंद पाळून दिला पाठिंबा

पाथर्डी प्रतिनिधी - राष्ट्रीय महामार्ग 222 नगर ते पाथर्डी रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास प

गोदावरी कालव्याच्या पाण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा : कोल्हे
ढवणवस्ती, तपोवन रोड येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन
तुम्हाला दिव्यांग मुले होतील…इंदुरीकर महाराजांनी दिला शाप

पाथर्डी प्रतिनिधी – राष्ट्रीय महामार्ग 222 नगर ते पाथर्डी रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी पाथर्डी तालुक्यात व शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये भाजपा वगळता सर्वपक्षीय नागरिक व व्यापारी वर्गाने प्रतिसाद देत लंकेना पाठिंबा दिला.
 गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अँड प्रतापराव ढाकणे यांच्या संपर्क कार्यालयापासून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान दराडे, माजी नगरसेवक डॉ. दीपक देशमुख, शहराध्यक्ष योगेश रासने,  वैभव दहिफळे, आक्रम आतार, आतिश निर्‍हाळी, बाळासाहेबांची शिवसेनाचे तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे, वंचित बहुजनचे अरविंद सोनटक्के, चाँद मणियार, चंद्रकांत भापकर, मुन्ना खलिफा, काँग्रेसचे महेश दौंड, आनंद सानप, किशोर डांगे, सुनील दौंड, गणेश दिनकर, युसुफ खान, जुनेद पठाण, आकाश काळोखे, मोहम्मद खान, सचिन नागपुरे, संदीप राजळे, अनिकेत निनगुरकर, विनय बोरुडे यांनी शहरातून फेरी काढत व्यापार्‍यांना आपली आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन केले. सर्व स्तरातील व्यापार्‍यांनी यास उत्स्फूर्तपणे साथ देत दुकाने बंद ठेवली व आमदार लंके यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शविला. तर राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष शिवशंकर राजळे,युवा नेते ऋषिकेश ढाकणे, माजी नगरसेवक बंडूपाटील बोरुडे,माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ यांच्यासोबत नगर येथे आंदोलनात बुधवारपासूनच सहभागी झाले होते. यावेळी शहरातील वसंतराव नाईक चौकात सर्वपक्षीय नेत्यांनी बोलताना म्हटले की, हा काही राजकीय स्टंट नसून सर्व तालुक्यातील जनतेचा जिव्हाळाचा प्रश्‍न आहे.आजपर्यंत या महामार्गाच्या दुरवस्थानर अनेक बळी घेतले आहेत. गेल्या सात आठ वर्षांपासून हा प्रश्‍न रखडलेला आहे.यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यानी आंदोलने केली.परंतु अधिकार्‍यानी थातूरमातूर आश्‍वासने देत वेळ मारून नेण्याचे काम केले गेले.आज पारनेरचे लोकप्रतिनिधी आपल्या महामार्गासाठी आंदोलन करतात ही शोकांतिका आहे. तरी लंके यांना पाठींबा म्हणून दिवसभर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

COMMENTS