Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोलेत हॉटेल, ढाब्यांची झाडाझडती

अकोले : आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे. गॅस टंचाईने गॅस एजन्सीच्या दुकानात समोर गॅस टाकी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर अकोले तहसीलच्या पुरवठा विभागाने अकोले शहरातील हॉटेल, धाबे -रेस्टॉरंट यांची झाडाझडती घेत तपासणी केली. अकोले शहरात पुरवठा विभागाच्या या धडक कारवाईत ३५ हॉटेल-रेस्टॉरंटची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली यात ७ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे.व्यावसायिक वापरासाठी घरगुती एलपीजीचा वापर आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान काही ठिकाणी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुरवठा विभागाने कारवाई करून एकूण ७ घरगुती एलपीजी सिलेंडर जप्त केले आहेत.संबंधित प्रकरणांमध्ये नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती या पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व ढाबा चालकांनी व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे.  सदर कारवाई तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे,यांचे मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाच्या पथकाकडून करण्यात आली असून पथकात संदीप निळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, राम जाधव, लिपिक पुरवठा विभाग तसेच होमगार्ड दिलीप पवार यांचा सहभाग होता. 

ध्येय गाठण्यासाठी वाचनाचा छंद जोपासावा : आभाळे
जवळा गटातील शेतकऱ्यांचा वीजप्रश्न मार्गी लागणार; आजिनाथ हजारेंची सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडे मागणी
शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अकोले : आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे. गॅस टंचाईने गॅस एजन्सीच्या दुकानात समोर गॅस टाकी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर अकोले तहसीलच्या पुरवठा विभागाने अकोले शहरातील हॉटेल, धाबे -रेस्टॉरंट यांची झाडाझडती घेत तपासणी केली.

अकोले शहरात पुरवठा विभागाच्या या धडक कारवाईत ३५ हॉटेल-रेस्टॉरंटची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली यात ७ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे.व्यावसायिक वापरासाठी घरगुती एलपीजीचा वापर आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

तपासणी दरम्यान काही ठिकाणी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुरवठा विभागाने कारवाई करून एकूण ७ घरगुती एलपीजी सिलेंडर जप्त केले आहेत.संबंधित प्रकरणांमध्ये नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती या पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व ढाबा चालकांनी व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे.

 सदर कारवाई तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे,यांचे मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाच्या पथकाकडून करण्यात आली असून पथकात संदीप निळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, राम जाधव, लिपिक पुरवठा विभाग तसेच होमगार्ड दिलीप पवार यांचा सहभाग होता. 

COMMENTS