Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेबांचे जीवन आजच्या पिढीस प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागरसौ. के.एस.के. महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

बीड : दि. 14 एप्रिल 2026 रोजी सौ. के.एस.के. महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक

डॉ. आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचे दीपस्तंभ : माजी आ. काळे
केजमध्ये खा.बजरंग सोनवणे यांनी अर्पण केली महामानवाला मानवंदना!
महात्मा फुले यांनी सामाजिक क्रांती घडवली : डॉ. प्रमोद गायकेसौ. के.एस.के. महाविद्यालयात महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी

बीड : दि. 14 एप्रिल 2026 रोजी सौ. के.एस.के. महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. क्षीरसागर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताचे संविधान शिल्पकार नसून जागतिक दर्जाचे महान विचारवंत होते. त्यांनी विविध विषयांवर सखोल लेखन करून समृद्ध ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. हजारो वर्षांपासून संधींपासून वंचित राहिलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. बाबासाहेबांच्या जीवनकार्यापासून आजच्या युवकांनी प्रेरणा घेऊन सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय योगदान द्यावे, असेही त्यांनी नमूद केले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, बाबासाहेबांच्या कार्यामुळे स्त्रीशक्ती व दलित समाजाच्या उन्नतीला मोठा आधार मिळाला. तसेच त्यांनी कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले असून त्या विद्यापीठाने त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज या उपाधीने गौरविले असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमास पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. ए. एस. खान, उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयंत साठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. यादव घोडके यांनी मानले.

COMMENTS