Homeताज्या बातम्या

पूर्णा रोडवरील भरधाव कारचा थरार; दोन दुचाकींना धडक देत थेट दुकानात घुसली

नांदेड : शहरातील पूर्णा रोड परिसरात रविवारी मध्यरात्री भरधाव कारने दोन दुचाकींना धडक देत थेट एका दुकानात घुसल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघाता

मुदखेड पोलिसांची मोठी कारवाई; ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत अवैध रेतीचा टिप्पर जप्त, १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; मुंबईतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झालेला नराधम जेरबंद
कारवाई की पाठराखण? नियंत्रण कक्षातून थेट वाहतूक शाखेत मारोती मुंडे यांची नियुक्ती; पोलीस दलात चर्चेला उधाण
Nanded : नांदेडमध्ये कारचा थरार; अनेक वाहनांना धडक देत चौघांना उडवलं, घटना  सीसीटीव्हीत कैद

नांदेड : शहरातील पूर्णा रोड परिसरात रविवारी मध्यरात्री भरधाव कारने दोन दुचाकींना धडक देत थेट एका दुकानात घुसल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात दुचाकी, कार तसेच दुकानाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘एमएच-२६ सीएम-१२८८’ क्रमांकाची कार ३१ मे रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पूर्णा रोडवरून जात होती. यादरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली आणि त्यानंतर कार पुढे जाऊन एका दुकानात घुसली.

अपघाताच्या वेळी दुकान बंद असल्याने आणि परिसरात नागरिकांची वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नसल्याने गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, या मध्यरात्रीच्या थरारामुळे पूर्णा रोड परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

COMMENTS