Homeताज्या बातम्याराजकारण

नांदेड विधानपरिषद रणसंग्राम : चव्हाणांचे ‘चाणक्य’ राजूरकर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर; महायुतीतील छुप्या संघर्षाचीही चर्चा

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होताच नांदेडच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. भाजपाच

महायुतीचा धर्म सर्वोच्च; नांदेडमध्ये एकसंघतेचा संदेशसंवादातूनच राजकीय प्रश्नांचे निराकरण शक्य; महायुती अधिक बळकट करण्याचा निर्धारराज्यातील जागावाटपाचा निर्णय सर्वांनी स्वीकारावा; नांदेडमध्ये अमरनाथ राजूरकर यांच्याभोवती महायुती एकवटली – खासदार अशोकराव चव्हाणप्रवीण चिखलीकरांचा अर्ज मागे; अमरनाथ राजूरकरांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर पाठिंबा – आमदार  चिखलीकर
धर्मभूषण ड. दिलीप ठाकूर यांच्या कायापालटचे 75 महिने पूर्ण; 3700 हून अधिक बेसहारांना नवजीवन
जिल्हा नियोजन निधीसाठी पालकमंत्र्यांच्या दारात नगरसेवकांची रांग; महापालिकेत प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी संघर्ष तीव्र



महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होताच नांदेडच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा खासदार अशोकराव चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांचे नाव पुन्हा एकदा आघाडीवर आले असून, सलग तिसर्‍यांदा विधानपरिषदेवर जाण्याची त्यांची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील अंतर्गत राजकारण, स्थानिक गटबाजी आणि जुने राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आले आहेत.
एकेकाळी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या नांदेडमध्ये गेल्या काही वर्षांत मोठे राजकीय बदल झाले. अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेडमधील सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलले. या बदलामध्ये अमरनाथ राजूरकर यांची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव निर्णायक ठरल्याचे मानले जाते. विशेषतः नांदेड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता स्थापन करण्यामागे राजूरकरांचे नियोजन आणि चव्हाण यांची रणनीती महत्त्वाची ठरली होती. त्यामुळे भाजपाकडून त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला जाण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. राजूरकर हे मूळतः काँग्रेसमधून पुढे आलेले नेते असले तरी त्यांनी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. आता भाजपातही त्यांनी आपले वजन वाढवले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संपर्क आणि अनुभवाच्या जोरावर ते पुन्हा निवडून येण्यासाठी सक्षम उमेदवार मानले जात आहेत. दुसरीकडे, काँग्रेससमोर मात्र अस्तित्वाची लढाई उभी ठाकल्याचे चित्र आहे. अशोकराव चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांच्या बाहेर पडण्यानंतर जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची चर्चा आहे. स्थानिक नेतृत्व अजूनही सक्षम पर्याय उभा करण्यात अपयशी ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे काँग्रेस ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार की केवळ औपचारिक उमेदवारी देऊन माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र वरकरणी दिसत असले तरी पडद्यामागे वेगळीच समीकरणे तयार होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेषतः आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. चिखलीकर आणि खा.अशोकराव चव्हाण यांच्यातील जुनी राजकीय स्पर्धा सर्वश्रुत आहे. त्यामुळे राजूरकरांच्या उमेदवारीला स्थानिक स्तरावर कोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो, यावर निवडणुकीतील वातावरण ठरणार असल्याचे मानले जात आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा आदेश आणि महायुतीची अधिकृत भूमिका यामुळे उघड संघर्षाची शक्यता कमी असली, तरी स्थानिक पातळीवरील नाराजी, गटबाजी आणि कार्यकर्त्यांमधील सुप्त असंतोष निवडणुकीत वेगळे वळण देऊ शकतो, अशीही चर्चा आहे. विशेष म्हणजे, अमरनाथ राजूरकर यांना पुन्हा संधी मिळाली आणि ते विजयी झाले, तर नांदेडच्या राजकीय इतिहासात सलग तीन वेळा विधानपरिषदेवर निवडून जाणारे ते पहिले नेते ठरतील. गेल्या बारा वर्षांतील त्यांचा अनुभव, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाव आणि खा.अशोकराव चव्हाण यांचे सूक्ष्म राजकीय नियोजन यामुळे त्यांची बाजू मजबूत मानली जात आहे. मात्र, निवडणुकीतील खरी उत्सुकता काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा महायुतीतील अंतर्गत समीकरणांकडे अधिक लागली असून, चव्हाण-चिखलीकर या राजकीय संघर्षाचा परिणाम कितपत दिसून येतो, हे पाहणे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

COMMENTS