हसन मुश्रीफ यांच्या घर- कारखान्यावर आयकरचे छापे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हसन मुश्रीफ यांच्या घर- कारखान्यावर आयकरचे छापे

पिता-पुत्राने कोट्यावधींची कर चोरी केल्याचा संशय

कोल्हापूर : महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर असून, गुरूवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि ग्रामवि

महापालिका निवडणुका आणि ओबीसी-मराठा आरक्षण!
कॉपीमुक्त परीक्षेचा विद्यार्थ्यांनी घेतला धसका
सत्कार सोहळा म्हणजे समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे व्यासपीठ-डॉ.योगेश क्षीरसागर

कोल्हापूर : महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर असून, गुरूवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मधील घरावर आणि त्यांच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापे टाकल्यामुळे खळबळ उडाली. कोट्यावधी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप हसन मुश्रीफ आणि त्यांचा मुलगा नाविद मुश्रीफ याच्यावर आहे.
छापे टाकल्याची माहिती मिळताच हसन मुश्रीफ हे मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला पोहोचले आणि तेथून कागलच्या निवासस्थानी दाखल झाले. हसन मुश्रीफ यांना भेटायला शेकडो कार्यकर्ते आले होते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अधिकार्‍यांबरोबर आलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पांगवले. सध्या हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर आयकरवर विभागाकडून चौकशी सुरू आहे. नाविद मुश्रीफ हे या साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांची कर चोरी केल्याचा मावशीला पिता पुत्रांवर आरोप आहे. राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री प्राजक्त तनपुरे यांची तेरा कोटीची मालमत्ता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्त केली आहे.
दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडमोडींना वेग येत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजप आक्रमक होऊन राज्य सरकारला अडचणीत आणत आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीची महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीचा तपशील बाहेर येऊ शकला नाही, तरी तपास यंत्रणांना रोखायचे कसे, हा प्रश्‍न राष्ट्रवादी काँगे्रसमोर आहे. त्यामुळे या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा होणार याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण केंद्रीय तपास संस्थांचा ससेमिरा आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही बैठक बोलावली होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार प्रफुल पटेल उपस्थित होते.

COMMENTS