Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड जिल्ह्याचा निकाल 15 टक्क्यांनी घसरला ; मुलींचे पुन्हा वर्चस्व, अर्धापूर अव्वल तर कंधार सर्वात कमी

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च-एप्रिल 2026 च्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शन

उन्हाच्या तडाख्यात दिव्यांग विद्यार्थ्यांचे हाल; आदेश असूनही दीड महिना सकाळी शाळा नाही; नांदेडमधील विशेष शाळेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह; पालक, कर्मचारी आणि दिव्यांग संघटनांत संताप
खत टंचाई व काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांची धडक तपासणी
किनवटमध्ये कृषी विक्रेत्यांचा एल्गार! खरिपाच्या तोंडावर संपाचे रणशिंग

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च-एप्रिल 2026 च्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, नांदेड जिल्ह्याचा एकूण निकाल 78.50 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल 15 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच उज्ज्वल कामगिरी करत निकालात आपले वर्चस्व कायम राखले आहे. इयत्ता बारावी विज्ञान चा जिल्ह्याचा निकाल 88.82 टक्के वाणिज्य शाखेचा 70.64% व्होकेशनल चा 66.74% आणि कला शाखेचा 60.11% निकाल लागला आहे.
निकालाची घसरलेली टक्केवारी हा कॉपीमुक्त अभियानाचा फटका असल्याचे बोलले जात आहे. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली कॉपी मुक्ती मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली होती. या मोहिमेला यश आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. यंदा जिल्ह्यातील एकूण 48 हजार 652 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 48 हजार 500 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातून 38 हजार 72 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा सरासरी निकाल 78.50 टक्के इतका नोंदवला गेला आहे.  तालुकानिहाय निकालात अर्धापूर तालुका 94.00 टक्क्यांसह जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. त्यानंतर मुदखेड (89.50%), नांदेड (87.33%), लोहा (85.20%) आणि देगलूर (84.10%) या तालुक्यांनी चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, कंधार तालुक्याचा निकाल सर्वात कमी 63.16 टक्के लागला असून तो जिल्ह्यात तळाशी राहिला आहे. याशिवाय किनवट (65.30%), माहूर (66.90%) आणि बिलोली (68.50%) या तालुक्यांचे निकालही तुलनेने कमी राहिले आहेत. नांदेड जिल्ह्यातील एकूण 40हजार 523विद्यार्थी फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या बारावी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. प्रति व्यक्तीस हजार 489 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत जिल्ह्यात 41 हजार 60 विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये मुलांची संख्या 21 हजार 743 तर मुलींची संख्या  18हजार 780इतकी होती. यापैकी 15 हजार 890 मुली बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत तर पंधरा हजार 599 मुले उत्तीर्ण झाले आहेत तुलनेमध्ये मुलींनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील मुलींचा निकाल 84.61 टक्के लागला असून मुलांचा निकाल 71.74 टक्के इतका आहे. त्यामुळे मुलींची शैक्षणिक प्रगती अधोरेखित झाली आहे. दरम्यान, निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी इंटरनेट कॅफे आणि मोबाईलच्या माध्यमातून निकाल पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे वाटून व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. काही महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांच्या यशाचा जल्लोष पाहायला मिळाला एकूणच, यंदाच्या निकालात घट झाल्याचे चित्र दिसत असले तरी विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्साह कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, निकालातील घसरणीची कारणे शोधून पुढील वर्षासाठी शैक्षणिक धोरणात सुधारणा करणे आवश्यक ठरणार आहे.

COMMENTS