Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये ऐतिहासिक भिडेवाडा चित्ररथाचे भव्य स्वागतमहात्मा फुले समता परिषदेतर्फे मिरवणूक; समता, बंधुता व ज्ञानाचा संदेश

नांदेड : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त दि. 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत केंद्र व

अभिवादन : बीडमध्ये युवा रिपाइंतर्फे महात्मा फुले यांना महामानव वंदना!
डॉ. आंबेडकरांचे उपकार विसरू नयेत : चौरे 
क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले

नांदेड : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त दि. 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पुढाकारातून महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित ‘ऐतिहासिक भिडेवाडा’ चित्ररथ तयार करण्यात आला असून तो महाराष्ट्रभर फिरवण्यात येत आहे.
या चित्ररथात महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती पुतळे तसेच महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. यासोबतच छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळेही साकारण्यात आले आहेत. ज्ञानाचे प्रतीक म्हणून पुस्तक व पेन यांची प्रभावी मांडणी करून समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला आहे. तसेच भिडेवाड्याची प्रतिकृतीही चित्ररथात उभी करण्यात आली आहे. हा चित्ररथ समता, बंधुता, न्याय आणि ज्ञान यांचा संदेश देत राज्यातील गावोगावी पोहोचत आहे. प्रत्येक ठिकाणी महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे. दि. 1 मे रोजी नांदेड शहरात या चित्ररथाचे भव्य स्वागत करण्यात आले. महात्मा बसवेश्वर पुतळा (नवीन कौठा) येथून फटाक्यांच्या आतषबाजी व बँडच्या गजरात मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. शेवटी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यासमोर मोठ्या उत्साहात स्वागत सोहळा पार पडला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संघरत्न गायकवाड, उपाध्यक्ष शिद्धोधन ढवळे, सरचिटणीस अनिल गायकवाड, सचिव रवि बहादुरे, उत्तम कांबळे, फिरोज पटेल, सचिन व्यवहारे, लखन वाघमारे, नितीन कांबळे, माजी नगराध्यक्ष पंचशील कांबळे, अ‍ॅड. धम्मपाल कदम, रमेश सोनाळे, विलास गजभारे, एकनाथ वाघमारे, शेख सोहेल, आनंद जाधव, शेख इरफान, शुभम राऊत यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS