Homeताज्या बातम्या

म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांची ‘गेटवे ऑफ इंडिया’ला भेट; विमानतळावरील सुविधांचीही केली पाहणी

मुंबई : भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाइंग यांनी आज मुंबईतील ऐतिहासिक 'गेटवे ऑफ इंडिया'ला भेट दिली. यावेळी त्यांच्य

विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत नाराजीनाट्य; ठाण्याच्या जागेसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा चर्चेत
महाराष्ट्रात आता सरकारी जमिनीवर गवत लागवड! महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना
मुंबईत माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये मोठी आग; पाहा थरारक दृश्ये

मुंबई : भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाइंग यांनी आज मुंबईतील ऐतिहासिक ‘गेटवे ऑफ इंडिया’ला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचे शिष्टमंडळ, तसेच ताज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाइंग यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तूरचना, ऐतिहासिक महत्त्व आणि त्यामागील वारसा याबाबात सविस्तर माहिती जाणून घेतली. भेटीदरम्यान त्यांनी या भव्य स्मारकाची बारकाईने पाहणी करत भारताच्या इतिहासातील या स्थानाविषयी विशेष उत्सुकता दाखवली आणि कौतुक केले.

दरम्यान, म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाइंग यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवासी सोयी-सुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद ‘इमिग्रेशन’ सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

यावेळी राष्ट्राध्यक्ष ह्लाइंग यांच्यासोबत म्यानमारच्या राष्ट्रपती कार्यालयाचे केंद्रीय मंत्री खिन मौंग यी, वित्त आणि महसूल मंत्री डॉ. कान झॉ, कृषी मंत्री मिन नाउंग, उद्योग मंत्री डॉ. चार्ली थान, परराष्ट्र व्यवहार मंत्री तिन मौंग स्वे, म्यानमारच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर डॉ. खिन नाइंग ऊ, संरक्षण दलातील लेफ्टनंट जनरल मो म्यिंट स्वे, राष्ट्रीय नियोजन आणि परकीय आर्थिक संबंध मंत्री यू थंत सिन ल्विन, स्थलांतर आणि लोकसंख्या मंत्री डॉ. खाइंग खाइंग सो आणि वाणिज्य मंत्री मिन मिन आदी उपस्थित होते. तसेच राजशिष्टाचार अधिकारी दिलीप शेडमखे, अदानी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विष्णू झा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक दीपक अग्रवाल हे अधिकारीदेखील उपस्थित होते.

COMMENTS