Homeताज्या बातम्या

राज्यात २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; १ कोटीहून अधिक बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट

राज्यात २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; १ कोटीहून अधिक बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट मुंबई : राज्यातील बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारा

बेलापूर ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर; १७ पैकी ९ जागा महिलांसाठी राखीव
पाय बांधून १० गोऱ्हे मैदानात टाकले; राहुरी फॅक्टरी येथील धक्कादायक घटना, नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
गोदावरी नदीपात्रात नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा दणका; २ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, १० रेती माफियांवर गुन्हा

राज्यात २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; १ कोटीहून अधिक बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट

राज्यात 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिन | Saamana (सामना)

मुंबई : राज्यातील बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी २८ जून २०२६ रोजी ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिन’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सुमारे १ कोटी २ लाख ९१ हजार ८१६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच गोवर-रुबेला निर्मूलन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधातील (सर्वायकल कॅन्सर) लसीकरण मोहिमांनाही गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य लसीकरण कृती दलाच्या बैठकीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यभरात या मोहिमेसाठी ८९ हजार ४८९ लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार असून, घरभेटीसाठी २ लाख ७६ हजार १६१ पथक-दिवस, संक्रमण (हाय-रिस्क) भागांसाठी २६ हजार ५३० पथक-दिवस, १३ हजार ५१८ भ्रमणशील पथक-दिवस तसेच ५८६ विशेष रात्रपथके कार्यरत राहणार आहेत.

महाराष्ट्राने पोलिओ निर्मूलन मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. राज्यात पोलिओचा शेवटचा रुग्ण सप्टेंबर २०१० मध्ये बीड जिल्ह्यात आढळला होता. देशातील शेवटचे पोलिओ प्रकरण जानेवारी २०११ मध्ये पश्चिम बंगालमध्ये नोंदविण्यात आले. त्यानंतर २७ मार्च २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताला ‘पोलिओमुक्त देश’ म्हणून मान्यता दिली.

या बैठकीत गोवर-रुबेला निर्मूलन कार्यक्रमाचाही आढावा घेण्यात आला. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत राज्यात पहिल्या डोसचे लसीकरण ९९.६ टक्के, तर दुसऱ्या डोसचे लसीकरण ९९.४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये गोवरचे उद्रेक झाल्याने लसीकरणाबाबत अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.

COMMENTS