Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

कांदा प्रश्नी महाराष्ट्रात शेतकरी पेटला! संतप्त शेतकऱ्यांचा मुंबई-आग्रा हायवेवर ‘रास्ता रोको’

https://www.youtube.com/watch?v=iHrKZIh4Jws कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यानं आता महाराष्ट्रातील शेतकरी आणि महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. ना

काँगे्रसची माघार, ठाकरेंची अखेर सरशी; विधानपरिषद निवडणुकीसाठी 10 अर्ज दाखल; शिवसेनेकडून बच्चू कडू, डॉ. गोर्‍हे यांना संधी
घरी बोलावून मंत्री केलं ही माझी चूक; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आ. बच्चू कडूंवर टीकास्त्र
राजा शिवाजी चित्रपट करमुक्त करा : आ. दानवेंची मागणी

कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यानं आता महाराष्ट्रातील शेतकरी आणि महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या ‘क्रांती महामोर्चा’मुळे प्रचंड खळबळ उडाली असून संतप्त आंदोलकांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला आहे. चांदवड परिसरात दूर-दूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. या महामोर्चात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मविआचे हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी गळ्यात कांद्याची माळ घालून रस्त्यावर उतरले आहेत.
या मोर्चातून आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, हा मोर्चा आमचा नसून सामान्य शेतकऱ्यांचा आहे. १८ तारखेला मुख्यमंत्र्यांनी २४ रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता १२ रुपये दिले जात आहेत. नाफेडकडून होणाऱ्या खरेदीत मोठा घोळ असल्याचा आरोप करत, केवळ २ लाख टन खरेदीने काही होणार नाही, तर परराज्यातही कांदा विकण्याची परवानगी द्यावी आणि शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे, अशी मागणी रोहित पवारांनी केली.

COMMENTS