Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

मुंबईत सीएनजी दोन रूपयांनी महागलारिक्षा, टॅक्सी भाडेवाढीची शक्यता व्यक्त

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी गॅसच्या दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ

शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी पत्रकार अनिल धमने
एसआयआरचा तिसरा टप्पा जाहीरमहाराष्ट्रासह 19 राज्यांत होणार मतदार पडताळणी37 कोटी मतदारांवर पडणार प्रभाव ; बूथस्तरीय अधिकार करणा तपासणी
आरेत समृद्ध, प्रेरणादायी जंगल निर्माण करणार : मंत्री शेलार80 एकर जागेत 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ


मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी गॅसच्या दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली असून गुरूवारपासून नवे दर लागू झाले आहेत. या वाढीनंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि महानगर परिसरातील इतर भागांमध्ये संपीडित नैसर्गिक वायूचा दर 84 रुपये प्रति किलो झाला आहे. यापूर्वी ग्राहकांना यासाठी 82 रुपये मोजावे लागत होते.
मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहने या इंधनावर चालतात. त्यामुळे या दरवाढीचा थेट परिणाम लाखो वाहनचालक आणि प्रवाशांवर होणार असल्याचे मानले जात आहे. सार्वजनिक वाहतुकीचा मोठा भाग या इंधनावर अवलंबून असल्याने आगामी काळात प्रवास खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरवाढ जाहीर होताच विविध रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी पुढे केली आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार, इंधन खर्चासोबतच वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च, सुटे भाग, विमा आणि देखभाल यांचा आर्थिक भार सातत्याने वाढत आहे. सध्याच्या भाड्यात व्यवसाय चालवणे कठीण बनले असून किमान भाड्यात किमान 1 रुपयांची वाढ करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. काही संघटनांनी इशारा दिला आहे की, मागणी मान्य न झाल्यास पुढील आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो. दुसरीकडे, सर्वसामान्य नागरिकांमध्ये या निर्णयामुळे नाराजीचे वातावरण आहे. आधीच अन्नधान्य, घरभाडे, वीज, शिक्षण आणि इतर जीवनावश्यक खर्च वाढत असताना आता प्रवास खर्च वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. रोज कामानिमित्त लांब पल्ल्याचा प्रवास करणार्‍या नोकरदार वर्गाला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. मासिक खर्चाचे गणित बिघडण्याची चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS