Homeताज्या बातम्या

खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते पीएसआय सोमनाथ भुसारी यांचा जाहीर सत्कार; 33 वर्षांच्या प्रदीर्घ पोलीस सेवेनंतर पदोन्नती

युसूफवडगाव : केज तालुक्यातील युसूफवडगाव येथील रहिवासी श्री. सोमनाथ भुसारी यांना पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल बीड ज

तुम्ही ग्रामीण भागात सेवा द्या, मी डाक कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रात प्रयत्न करतो
घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते तातडीने द्या; खा.बजरंग सोनवणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्रबीड जिल्ह्यात 54 हजार घरकुलांचे हप्ते रखडले
जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षेखा.बजरंग सोनवणेंनी बीडचा आवाज दिल्लीत घुमवला

युसूफवडगाव : केज तालुक्यातील युसूफवडगाव येथील रहिवासी श्री. सोमनाथ भुसारी यांना पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. श्री. सोमनाथ भुसारी हे गेल्या 33 वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत असून सध्या अंबाजोगाई येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक कार्यालयात सेवा बजावत आहेत. प्रदीर्घ काळ केलेल्या उल्लेखनीय सेवेनंतर त्यांना मिळालेल्या पदोन्नतीबद्दल कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सोमनाथ भुसारी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार सोनवणे यांनी भुसारी यांच्या प्रदीर्घ पोलीस सेवेचे कौतुक करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कार समारंभास श्रीमंत खरबड, अशोक मोडवे, महारूद्र लामतुरे, किरण सातपुते, सरपंच मुकूंद कणसे, दादासाहेब गायकवाड, राजाभाऊ खरबड, वैजनाथ थळकरी, सचिन जावळे, बाळासाहेब निशिगंध, शहाजी शिंदे, अनिल निकम, महादेव मोडवे, अशोक चोपणे, दत्ता निकम, ओम लामतुरे यांच्यासह गावकरी, मित्रपरिवार व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS