Homeताज्या बातम्या

श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड विकासकामांना मिळणार वेग उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

आष्टी तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आम

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट-बीड शहरातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी निधीची मागणी-बीड शहर, ग्रामीण भागातील विविध विकासकामांबाबतही निवेदन सादर
वक्फ सेवा इनाम जमिनीवरील अनधिकृत पत्र्याचे शेड हटविण्याची मागणीकलीम अहमद शेख यांचे प्रशासनाला निवेदन
बीड जिल्हा कामगार संघाकडून नवनियुक्त सरकारी कामगार अधिकारी देशमुख साहेबांचे स्वागत; कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन



आष्टी तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गडाच्या विकासाचा सविस्तर आराखडा सादर करण्यात आला.
बैठकीदरम्यान गडावर सुरू असलेली तसेच प्रस्तावित विविध विकासकामे यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये भक्तनिवास बांधकाम, प्रसादालय उभारणी, आधुनिक स्वच्छतागृहांची निर्मिती, मंदिराचा जीर्णोद्धार, अंतर्गत रस्ते, परिसर सुशोभीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत सुविधा आणि भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा यांसह अन्य कामांवर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी प्रत्येक कामाची सद्यस्थिती जाणून घेत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना कामे दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाचा विकास धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने आदर्श ठरेल, यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आ. सुरेश धस यांनी सांगितले की, श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, येथे येणार्‍या भाविकांना आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. गडाच्या विकासकामांना गती मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीस उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश (दादा) सोळंके, सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता सुनील चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग आष्टीचे कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ, वास्तुविशारद हेमंत पाटील तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळे श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाच्या विकासकामांना अधिक गती मिळणार असून, भाविकांसाठी आवश्यक सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देत गडाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व अधिक वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS