Homeताज्या बातम्या

नागराज बांधकाम पर्यवेक्षक हस्तकला अध्यापक महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल! चि. प्रतीक उगले प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

माजलगाव: नागराज बांधकाम पर्यवेक्षक हस्तकला अध्यापक महाविद्यालय, तेलगाव (ता. धारूर) यांनी यंदाच्या बांधकाम पर्यवेक्षक, हस्तकला व कार्यानुभव शिक्षक

पार्किंग ऐवजी मालमत्तेच्या हव्यासापोटी शिक्षिकेची क्रूर हत्या; मृत्यूपत्रावर जबरदस्तीने स्वाक्षरी घेऊन शेजाऱ्यांनीच रचला बनाव!
कर्जतमध्ये २७ वा कारगिल विजय दिन उत्साहात साजरा; माजी सैनिकांचा सन्मान आणि वृक्षारोपण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाविकांना ५ हजार छत्र्यांचे वाटप; तुळजापुरात महाआरतीचे आयोजन

माजलगाव: नागराज बांधकाम पर्यवेक्षक हस्तकला अध्यापक महाविद्यालय, तेलगाव (ता. धारूर) यांनी यंदाच्या बांधकाम पर्यवेक्षक, हस्तकला व कार्यानुभव शिक्षक प्रमाणपत्र (PTC) परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातील प्रवेशित ६० पैकी ६० विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले असून, या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यंदाच्या परीक्षेत चि. प्रतीक विष्णू उगले यांनी ७०० पैकी ६१९ गुण मिळवत ८८ टक्के गुणांसह महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रतीक उगले हे माजलगाव येथील पत्रकार विष्णू (दादा) उगले यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल पत्रकारिता क्षेत्रासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रतीक यांच्या यशामागे त्यांचे अथक परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन कारणीभूत ठरले आहे. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाचे नाव जिल्हाभर अभिमानाने उजळले आहे.

विशेष म्हणजे, यंदाचे वर्ष महाविद्यालयासाठी अधिक आनंदाचे ठरले असून संस्थेने यशस्वी शैक्षणिक वाटचालीची १६ वर्षे पूर्ण केली आहेत. या कालावधीत महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्कृष्ट निकाल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

महाविद्यालयाचे प्रमुख हरी गिरी सर यांनी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षकवृंद, पालक आणि संस्थेतील सर्व सहकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल परिसरातून कौतुक होत असून, भविष्यातही अशीच गुणवत्तेची आणि यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास प्राचार्य हरी गिरी यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS