Homeताज्या बातम्या

बोधन-बिलोली-मुखेड-लातूर रोड रेल्वेमार्गाला गतीभारतीय रेल्वेच्या नकाशावर नोंद; 2,500 कोटींच्या प्रकल्पासाठी भूसंपादन लवकरच

 मराठवाडा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाला जोडणार्‍या महत्त्वाकांक्षी बोधन-बिलोली-नरसी-मुखेड-जळकोट-लातूर रोड नव्या रेल्वेमार्गाच्या प्रकल्पाला मोठी ग

मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी नांदेडवर पावसाचा दमदार प्रहार; वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् शहर अंधारात
किनवटमध्ये भाजपच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात; एन. के. गार्डन येथे भव्य योग शिबिर संपन्नकिनवट
अवकाळी पावसाचा नांदेड जिल्ह्याला तडाखा; नांदला-दिग्रस परिसरात केळी बागांचे मोठे नुकसान



 मराठवाडा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाला जोडणार्‍या महत्त्वाकांक्षी बोधन-बिलोली-नरसी-मुखेड-जळकोट-लातूर रोड नव्या रेल्वेमार्गाच्या प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे. भारतीय रेल्वेच्या अधिकृत नकाशावर या मार्गाची नोंद झाल्याने बिलोलीसह संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सुमारे 2,500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सुमारे 135 किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग बोधन, बिलोली, नरसी, धामणगाव, मुखेड, सांगवी, लादगा, कुमठा, जळकोट आणि लातूर रोड या भागांतून जाणार आहे. मुंबई ते विशाखापट्टणम या महत्त्वाच्या बंदरांना जोडणार्‍या रेल्वे संपर्काचा हा एक महत्त्वाचा दुवा ठरणार असून, भविष्यात व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या रेल्वेमार्गासाठी 2016 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सर्वेक्षणास मंजुरी दिली होती. त्यानंतर खासदार अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे, रवींद्र चव्हाण तसेच माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संसदेत सातत्याने पाठपुरावा केला. याशिवाय मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती आणि रेल्वे संघर्ष समिती, बिलोली यांनीही प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. 2023 मध्ये या रेल्वेमार्गाचे अंतिम लोकेशन सर्वेक्षण शंभर टक्के पूर्ण झाले.  झारखंडमधील एका तज्ज्ञ कंपनीने मार्गावरील भूभाग, खडकांचे नमुने, पूल, उड्डाणपूल तसेच जिरायती व बागायती जमिनींचा सविस्तर अभ्यास केला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 732 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार असून, त्यासंदर्भातील प्रशासकीय हालचालींना वेग आल्याची माहिती समोर येत आहे.
बिलोलीसाठी ठरणार विकासाचा नवा मार्ग
या रेल्वेमार्गाचा सर्वाधिक लाभ बिलोली शहर आणि तालुक्याला होणार असल्याचे मानले जात आहे. शेतकर्‍यांना कृषी मालासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, व्यापारी उलाढाल वाढेल, नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच शिक्षण व आरोग्य क्षेत्रालाही चालना मिळेल. त्यामुळे बिलोली आणि परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, निजामकालीन नोंदींमध्येही या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचा उल्लेख आढळतो. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला आता प्रत्यक्ष आकार मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय रेल्वेच्या अधिकृत नकाशावर नोंद झाल्याने बिलोलीसह संपूर्ण  विकासाच्या नव्या पर्वाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

COMMENTS