Homeताज्या बातम्या

देगलूर पोलिसांनी लावला गहाळ मोबाईलचा छडा; 15 दिवसांत 25 मोबाईल शोधून मालकांच्या ताब्यात

हरवलेले मोबाईल परत मिळण्याची आशा जवळपास संपलेल्या 25 नागरिकांच्या चेहर्‍यावर देगलूर पोलिसांनी पुन्हा आनंद फुलवला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वा

कॅन व कंटेनरमधून बेकायदेशीर इंधन विक्री; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न
जळगाव जामोद: कन्या शाळेची जागा रुग्णालयाला देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध; वंचितचाही पाठिंबा
वाडी (बु.) उपजिल्हा रुग्णालयासह नांदेड उत्तरमधील सर्व विकासकामांना गती द्या;नियोजित मुदतीत कामे पूर्ण करण्याच्या आ.कल्याणकर यांच्या अधिकार्‍यांना सूचना



हरवलेले मोबाईल परत मिळण्याची आशा जवळपास संपलेल्या 25 नागरिकांच्या चेहर्‍यावर देगलूर पोलिसांनी पुन्हा आनंद फुलवला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अवघ्या 15 दिवसांत तब्बल 25 गहाळ मोबाईलचा शोध घेऊन सुमारे 3 लाख 74 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात देगलूर पोलिसांना यश आले आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या सूचनेनुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रलंबित गहाळ मोबाईल प्रकरणांचा आढावा घेत तपासाला गती दिली. गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी सीटीईटी पोर्टल,आयएमईआय ट्रॅकिंग प्रणाली तसेच विविध मोबाईल सेवा प्रदात्यांकडून प्राप्त तांत्रिक माहितीचा प्रभावी वापर करण्यात आला.  या मोहिमेत मोबाईल शोध पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल के. जी. तलवारे यांनी विशेष परिश्रम घेत महत्त्वाची भूमिका बजावली. कारवाईदरम्यान ओप्पो, व्हिवो, रियलमी, सॅमसंग, रेडमी, मोटोरोला, टेक्नो आणि लावा कंपनीचे मोबाईल शोधून काढण्यात आले. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केल्यानंतर संबंधित मालकांना त्यांचे मोबाईल परत सुपूर्द करण्यात आले. गहाळ मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी देगलूर पोलिसांचे आभार व्यक्त केले असून, पोलिसांच्या या तत्पर आणि जनहिताच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. देगलूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी दृढ झाला आहे.
15 दिवसांत 25 मोबाईलचा शोध
एकूण मोबाईल 25, किंमत 3 लाख 74हजार 500, तांत्रिक साधने  सीईआयआर पोर्टल आणि आयएमईआय ट्रॅकिंग, विशेष योगदान पो.हे.कॉ. के. जी. तलवारे, मार्गदर्शन  पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, देखरेख  उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, नेतृत्व  पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, देगलूर पोलिसांची दमदार कामगिरी; 15 दिवसांत 25 गहाळ मोबाईल मालकांच्या हाती, तंत्रज्ञानाच्या मदतीने देगलूर पोलिसांचा पराक्रम; साडेतीन लाखांचे मोबाईल शोधले, हरवलेले मोबाईल मिळाल्याने नागरिक आनंदित; देगलूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक

COMMENTS