Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

बालयोगिणी मुक्तीनाथ यांची पंचधुनी तपस्या मौन अनुष्ठान व  संत मुक्ताबाई समाधी सोहळा

श्रीनाथ मढी मुक्तीनाथ तपोवन संस्थान, टाकराळा ता.हिमायतनगर जि.नांदेड येथे भारतीय संस्कृती व साधू संताची परंपरा जतन करत नाथ संप्रदयातील बालयोगिणी म

नांदेडचे पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांना ’स्वाभिमान लेखणी’ पुरस्कार12 जुलै रोजी मुंबईत होणार सन्मान; पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची दखल
श्री गुरू गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालय, विष्णुपुरी समोरील पुलाच्या घटनेची सखोल चौकशी करा; अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल – प्रकाश मारावार
ग्रामीण गृहनिर्माणात नांदेड जिल्हा परिषदेचा राज्यात डंका



श्रीनाथ मढी मुक्तीनाथ तपोवन संस्थान, टाकराळा ता.हिमायतनगर जि.नांदेड येथे भारतीय संस्कृती व साधू संताची परंपरा जतन करत नाथ संप्रदयातील बालयोगिणी मुक्तीनाथ गुरु श्री महेश्वरीनाथ यांच्या सत्य संकल्पनेतून पंचधुनी तपस्या व मौन अनुष्ठान दि. 2 मे ते दि 12 मे  पर्यत 11 दिवसीय पंचधुनी तपस्या व मौन अनुष्ठान दि 12 मे 2026 रोजी आदिशक्ती संत मुक्ताबाई समाधी सोहळाच्या काल्याच्या किर्तनाने संपन्न झाले.
आदल्या दिवशी ह.भ.प.भागवताचार्य कु.ज्ञानेश्वरी दिदी अनुपवाडीकर यांचे किर्तन सेवा झाली. समाधी सोहळाचे काल्याचे किर्तन ह.भ.प.बालयोगी गजेंद्र चैतन्यजी महाराज, माधापुरी यांचे झाले या वेळी विशेष उपस्थिती योगिणी महेश्वरीनाथ गुरु भजननाथ आदेश आश्रम सुखपुर ता.बाबरा जि.अमरेली गुजरात , मौनी बाबा उदगिर , हिंगोलीचे खासदार  नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार  माधवराव पाटील जवळगांवकर ,गोविदराव नागेलीकर पंचक्रोशीतील सर्व भगतगण महाराष्ट्र, तेलंगना, आंध्रप्रदेश , कर्नाटक राज्यातील अनेक भक्तगण या वेळी उपस्थित होते.

COMMENTS