Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोहफुलांमुळे ग्रामीण मजुरांना रोजगार; माहूर तालुक्यात वेचणीचा हंगाम जोमात; पहाटेपासून शेतशिवार व जंगलात नागरिकांची लगबग; पंधरा ते वीस दिवसांचा हंगाम देतो रोजगाराची संधी

माहूर : माहूर तालुक्यातील समृद्ध वनसंपदेमध्ये मोहफुलाच्या झाडांना विशेष महत्त्व आहे. सध्या सुरू झालेल्या मोहफुल हंगामामुळे ग्रामीण भागातील शेतमजू

नांदेड जिल्हा बँकेच्या लोकार्पणावर राजकीय झगमगाट; शेतकरी मात्र दारातच थांबले!
हवामान बदलानंतरही गहू उत्पादन क्षमतेला चालना
सावधानतेची कसोटी !
मोहफुलाचा दारुसाठीच नाही, तर औषधासाठी देखील वापर होतो; जाणून घ्या 'मोहफुल'  काय आहे?

माहूर : माहूर तालुक्यातील समृद्ध वनसंपदेमध्ये मोहफुलाच्या झाडांना विशेष महत्त्व आहे. सध्या सुरू झालेल्या मोहफुल हंगामामुळे ग्रामीण भागातील शेतमजूर व नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. पहाटेच शेतशिवार व जंगल गाठून नागरिक मोहफुल वेचणीसाठी कामाला लागतात. या हंगामामुळे सुमारे पंधरा ते वीस दिवस मजुरांना रोजगाराची संधी निर्माण होते.
तालुक्यात मोहफुल, बेहडा, लेंडी, धावडा, सागवान यांसारख्या मौल्यवान व औषधी वनस्पतींचा मोठा साठा आहे. यामध्ये मोहफुलाच्या झाडाला विशेष स्थान असून त्याचे पान, फुल, फळ, खोड व मुळे अशा सर्वच घटकांचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. शेतातील मोहफुले प्रामुख्याने शेतमालकांकडूनच वेचली जातात, मात्र जंगलातील मोहफुले सर्वसामान्यांसाठी खुली असतात. हंगामाच्या सुरुवातीला झाडाखालील पालापाचोळा साफ करून जागा स्वच्छ केली जाते. ज्या व्यक्तीने ही स्वच्छता केली, तीच व्यक्ती संपूर्ण हंगामात त्या झाडावरील मोहफुले वेचते, अशी प्रथा आहे. यासाठी झाडावर कापड किंवा फाटलेली टोपली बांधून ओळख चिन्ह ठेवले जाते, ज्यामुळे संबंधित झाड राखीव असल्याचे इतरांना समजते. सध्या मेंडकी, मुंगशी, मलकागुडा, वानोळा, मांडवा, अजनी, साकुर, दहेगाव या भागांत मोहफुल वेचणीचा हंगाम जोरात सुरू असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा चांगला आधार मिळत आहे.

COMMENTS