Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोदींना हवेत चारशे पार ! शिर्डीत मात्र दिसते हार !!

खासदाराची चालूगिरी आणि खाबूगिरीची पोलखोल!

डॉ. अशोक सोनवणेअहमदनगर ः वाचक मित्रहो ! ... हे खळबळजनक सत्य सांगणारे वर्तमानपत्र आपल्या हाती देताना आनंद नव्हे तर दुःखच होत आहे. केवळ निवडून आले,

सचिव सुमंत भांगे हाजिर हो—-
सचिव भांगेंना बाईंनी दिली ‘छोबीपछाड’
‘व्यंकटेशा’! कुठं फेडशील हे पाप !

डॉ. अशोक सोनवणे
अहमदनगर ः वाचक मित्रहो ! … हे खळबळजनक सत्य सांगणारे वर्तमानपत्र आपल्या हाती देताना आनंद नव्हे तर दुःखच होत आहे. केवळ निवडून आले, एवढीच पात्रता, त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून उडी मारून एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झालेले शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीबाबत महायुतीचे गणित सर्वस्वी चुकले असल्याचे संकेत आपल्याला सगळीकडून स्पष्टपणे मिळत आहेत. या सर्व संकेतांची आणि कारणांची मिमांसा करणारा अंक निवडणूक होई पावेतो आपण जपावा व पुन्हा पुन्हा वाचावा, अशी आमची वाचकांना विनंती आहे.
बहुतेक मतदारांनी प्रत्यक्ष न पाहिलेले खासदार सदाशिव लोखंडे यांच्या बेजबाबदार पणावर लिहावे तितके कमीच! केवळ ठराविक उद्घाटनांच्या ठिकाणी ठराविक कार्यकर्ते, ठराविक ठेकेदार आणि अधिकार्‍यांसमोर जाऊन फोटो छापून आणणारे, फोटोछाप खासदार सदाशिव लोखंडे साहेब. हे नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांचा वापर करून घेण्यात अगदीच पटाईत आहेत, असे त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीवरून स्पष्टपणे दिसून येते. अगदी ढोबळपणे सांगायचे झाल्यास 2014 च्या निवडणुकीत त्यांनी थोरात, काळे आणि विशेष म्हणजे भल्यांना बिंगवणार्‍या मुरकुटे साहेबांसारख्या धुरंदर व्यक्तींचा वापर केला. त्यांच्या खांद्यावर लोखंडे नी मान ठेवली, असे निश्‍चितच म्हणता येणार नाही. वापर केला हा एकच शब्द परफेक्ट आहे कारण दुसर्‍यांदा त्यांनी स्टाईल आणि माणसे दोन्ही बदलली. नंतरच्या म्हणजे 2019 च्या निवडणुकीत त्यांनी मुरकुटे साहेबांना टाळले. पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिलेल्या ससाने गटाला हाती धरले. कोपरगाव भागातल्या काळेंना डावलले आणि कोल्हे हाती धरले. अकोल्याला पिचड लहामटे दोघांना गळ लावला. विखे कुटुंब भाजपात असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद तर आयताच होता. आता मात्र विखे वगळता पुन्हा चित्र बदलले आहे. नावे घेण्याची इथे आवश्यकता नाही. जुने कलाकार पुन्हा बदलले आहेत. वाचक सुज्ञ आहेत!

कृषी कंपनी बोगस कामे भ्रष्टाचार आणि मालमत्ता – मागे वृत्तपत्रामध्ये त्यांच्या या कृषी कंपन्या बाबतचे वृत्त हे खरेच मानावे लागेल. त्यातील आरोपांबाबत सार्वासारव करताना खासदार साहेबांनी मी दहा कोटी नाकारणारा खासदार आहे, अशी वल्गना केली. परंतु खासदार साहेबांनी फक्त खालील प्रश्‍नांची उत्तरे द्यावी. या कृषी कंपन्यांच्या नावे केंद्रातून निधी आणून केवळ भ्रष्टाचारासाठी हाय मॅक्स इंटरॅक्शन वॉटर प्युअर मशीन ची कामे केली गेली. यात एक रुपयाचा माल पाच रुपये खरेदी दाखवून सरकारी पैसा कोट्यावधींच्या प्रमाणात हडप करण्यात आला. हे खोटे आहे काय? एक लाख रुपये किमतीचा इंटरेस्टिंग पॅनल पाच लाख रुपयांचे कोटेशन दाखवून 27 कोटींची बिले काढली, हे खोटे आहे काय?

ड्रायव्हरने विष प्राशन केले का ? – काही विश्‍वसनीय सूत्रांनी नावे न सांगण्याच्या शपथेवर माहिती देऊन आमच्याही मनात अनेक प्रश्‍न निर्माण केलेले आहेत. एक त्यांच्या ड्रायव्हरने विष प्राशन केले, नंतर त्यांनी त्याला कामावरून काढून टाकले. त्याच्या त्या विष पिण्यामागचे गौडबंगाल नेमके काय? याचे उत्तर लोखंडे यांना देता येईल काय? असे कोणते संकट त्यांच्यावर आले होते. किंवा असा कोणता महाभयंकर गुन्हा त्या ड्रायव्हरने केला होता. याविषयीच्या गुप्ततेचा खुलासा होणे खूप गरजेचे आहे. कारण यामागे प्रॉपर्टी किंवा काहीही स्फोटक कारण असू शकते. एका खासदाराच्या गाडीच्या ड्रायव्हर वर विष पिण्याची वेळ यावी, हे प्रकरणच चौकशीसाठी व गुप्त तपासासाठी आग्रह करण्यासारखे नव्हे काय?

कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाली नाही का ? – वळद-उंबरगावला बांधलेला आपला बेकायदा खासगी बंगला हा धूत व आणखी एकाच्या खासदार निधीतून बांधलेला नाही काय? एका कृषी प्रोड्युुसर कंपनीच्या नावाखाली वॉटर प्युरीफायर, हायमॅक्स, इंटरेक्टीव्ह पॅनल्स यात रुपयाची वस्तू पाच रुपये दाखवून कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला नाही काय?

9822254475 वर संपर्क साधा – शिर्डी लोकसभा मतदारसंघाची खासदारकी दोनदा मिळूनही खासदार सदाशिव लोखंडे यांना लोकाभिमुख कारभार करता आला नाही. केवळ भ्रष्टाचाराच्या कुरणात आपले हात कसे ओले होईल याची दक्षता त्यांनी नेहमीच घेतली. त्यामुळे त्यांच्यावर लोकांची प्रचंड नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील वाचकांनी आपले मते, तक्रारी, तसेच भ्रष्टाचारासंदर्भात असलेल्या तक्रारीची पोलखोल करण्यासाठी 9822254475 या क्रमाकांवर संपर्क साधावा. आपली ओळख गुप्त ठेवण्यात येईल.

COMMENTS