डोक्यातला बर्ड फ्लू

Homeताज्या बातम्यासंपादकीय

डोक्यातला बर्ड फ्लू

महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून बर्ड फ्लू या रोगामुळे कुकुटपालन व्यावसायिकांचे दिवाळे निघालेले होते. आता पुन्हा हा रोग महाराष्ट्रात डोके वर काढत

महाराष्ट्रद्वेषाची कावीळ
भविष्याचा नवा कर्तव्यपथ
राज्यपालांचा मराठीद्वेष

महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून बर्ड फ्लू या रोगामुळे कुकुटपालन व्यावसायिकांचे दिवाळे निघालेले होते. आता पुन्हा हा रोग महाराष्ट्रात डोके वर काढत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील वेहळोली गावात मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममधील ३०० हून अधिक देशी कोंबडय़ा आणि बदके बर्ड फ्लू या रोगामुळे मरण पावले आहेत. या कोंबडय़ा आणि बदकांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याची बाब तपासणी अहवालात निष्पन्न झाली आहे. यामुळे कुकुटपालन व्यावसायिक धास्तावले आहेत. यामुळेच प्रशासन सतर्क झालं असून या क्षेत्राच्या एक किलोमीटर परीसातील २३ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. बाधित क्षेत्राच्या १० किलोमीटर परिघातील कोंबड्यांचे नमुने तपासण्याची मोहीम प्रशासनाकडून सुरु करण्यात आली. या बर्ड फ्लू रोगाने सर्वसामान्य नागरिक घाबरून चिकन घेत नसल्यामुळे पोल्ट्रीचा धंदा या काळात बंद असतो. शेतकरी शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय करतात. महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती सतत निर्माण होत असल्यामुळे आणि अवकाळी पाऊस तसेच आस्मानी संकटामुळे आपला शेतकरी सतत संकटात असतो. त्यात जोडधंदा म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय हा किफायतशीर असला तरी बर्ड फ्लू सारख्या साथीच्या आजारामुळे शेतकऱ्यांनी उभारलेल्या पोल्ट्री व्यवसायावर पाणी फेरले जाते. बर्ड फ्लू रोग हा स्तलांतरित पक्षांमुळे मोठ्या प्रमाणात पसरला जातो. त्यामुळे त्याला आला घालण्यासाठी शासन स्तरावरून उपाययोजना केल्या जातात. सध्या बर्ड फ्लू बाधितक्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील चिकन विक्रेते आणि वाहतूकदारांचे दैनंदिन कामकाज रोखण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यादरम्यान पशुसवर्धन मंत्री सुनील केदार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. शहापूरमधील बर्ड फ्लूची परिस्थिती सध्या आटोक्यात आहे. प्रशासन याबाबत खबरदारी घेत असून चिंता करण्याचं कारण नाही असं ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील केदार म्हणाले आहेत. मात्र आपल्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू आला म्हटलं की, लगेच लोक चिकन खाणे बंद करतात. त्याला काही अंशी माध्यमेही जबाबदार आहेत. त्यामुळे माणसाच्या डोक्यातील बर्ड फ्लू बद्दलची भीती कमी करण्यासाठी प्रबोधन आवश्यक आहे. 

COMMENTS