Homeताज्या बातम्या

म्हातारपिंपरी-मढेवडगाव रस्त्याचे सीमांकन; अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नाला अखेर मार्ग

श्रीगोंदा : तालुक्यातील म्हातारपिंपरी - मढेवडगाव येथील नकाशावरील शेतरस्त्याचे सीमांकन प्रशासन आणि शेतकरी यांच्या समन्वयातून शांततेत व यशस्वीरीत्य

बीड शहरातील अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांचा सामाजिक कार्यकर्त्यांकडून सत्कार
भाजी मंडईत केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ कुचकामी ठरणार काय?जनता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांचा सवाल
पंचवीस वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या पुढाकाराने नेकनूरमधील शेतरस्ता अखेर मोकळा

श्रीगोंदा : तालुक्यातील म्हातारपिंपरी – मढेवडगाव येथील नकाशावरील शेतरस्त्याचे सीमांकन प्रशासन आणि शेतकरी यांच्या समन्वयातून शांततेत व यशस्वीरीत्या पार पडले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार सचिन डोंगरे आणि भूमी उपअधीक्षक अविनाश मिसाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. यावेळी कर्तव्यदक्ष पीएसआय किरण शिंदे यांच्या उपस्थितीत प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण केली.

शिव पाणंद शेत रस्ते चळवळीचे दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोजणी अधिकारी वासुदेव पाटील यांनी रस्त्याचे अचूक सीमांकन केले. त्यानंतर तलाठी वाबळे मॅडम, कोतवाल योगेश ठोकळे, कॉन्स्टेबल काटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली.

या रस्त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतात जाण्यासाठी कायमस्वरूपी आणि कायदेशीर रस्ता उपलब्ध होणार असल्याने पावसाळ्यातील चिखल, अडथळे आणि वाहतुकीच्या समस्या कमी होणार आहेत. ट्रॅक्टर, हार्वेस्टर तसेच शेतीमाल वाहतुकीस मोठी सुविधा मिळणार असून, द्राक्ष, ऊस, भाजीपाला आणि इतर पिकांचा माल वेळेत बाजारपेठेत पोहोचविणे शक्य होणार आहे.

कारवाईच्या वेळी दादासाहेब जंगले पाटील, अनिलभाऊ वाबळे, बाप्पुसाहेब हिरडे, माजी सरपंच सचिन ठोकळे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS