बीड शहरातील प्रभाग क्रमांक 23 अंतर्गत आरिश मस्जिद परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून ठिक

बीड शहरातील प्रभाग क्रमांक 23 अंतर्गत आरिश मस्जिद परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे लहान मुले, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिसरात अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, याच प्रभागातून अनेक वर्षांपासून आमदार, खासदार आणि नगराध्यक्षांना मोठी आघाडी मिळत आली आहे. मात्र, विकासकामांच्या बाबतीत या परिसराकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निवडणुकीच्या वेळी मतांसाठी येणारे लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर या भागातील मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. आरिश मस्जिद परिसरात तातडीने सिमेंट काँक्रीट (उउ) रस्ता मंजूर करून काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

COMMENTS