कोपरगाव : विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वीजवाहिन्यांचे खांब वाकले असून तारा जमिनीच्या दिशेने लोंबकळत आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. तसेच वडगाव येथील श्री शनेश्वर देवस्थान आणि चासनळी येथील श्री रामेश्वर देवस्थान यांना ‘क’ वर्ग दर्जा देण्याची मागणीही त्यांनी केली. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याची माहिती काळे यांनी दिली. शुक्रवारी (दि. १५) जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यावेळी आ. आशुतोष काळे बोलत होते. काळे म्हणाले, “मतदारसंघातील अनेक गावांमध्ये विजेचे खांब वाकलेले असून तारा लोंबकळत आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार प्रत्यक्ष परिस्थितीचे छायाचित्रे पाठवूनही ‘मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर काम करू’ अशी वेळकाढूपणाची उत्तरे दिली जात आहेत. पावसाळा तोंडावर आला असून वादळी वाऱ्यामुळे वाकलेले खांब कोसळून वीजवाहिन्या तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना द्याव्यात.” सुरेगाव येथील महानुभाव पंथीय श्री चक्रधर स्वामी देवस्थानाला ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आल्याची नोंद कार्यवाही पुस्तिकेत आहे. मात्र निधी देताना हा दर्जा नसल्याचे सांगितले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आरोग्य सुविधांबाबत बोलताना काळे म्हणाले, “मागील बैठकीत मंजूर झालेल्या रुग्णवाहिका अद्याप कोपरगाव तालुक्याला मिळालेल्या नाहीत. त्या तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. तसेच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागासाठी निधी मंजूर असूनही काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात.” बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, संबंधित अधिकारी तसेच विविध मतदारसंघांतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ‘या’ देवस्थानांना ‘क’ वर्ग दर्जाची मागणी वडगाव येथील श्री शनेश्वर देवस्थान आणि चासनळी येथील श्री रामेश्वर देवस्थान यांना ‘क’ वर्ग दर्जा देण्याची मागणी आ. काळे यांनी केली. सदर प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आला आहे. त्या ठिकाणी एकही झाड नसल्याचा दाखला वन विभागाने दिला असून निर्वनीकरणही पूर्ण झाले आहे. तरीही जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कोपरगाव : विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वीजवाहिन्यांचे खांब वाकले असून तारा जमिनीच्या दिशेने लोंबकळत आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. तसेच वडगाव येथील श्री शनेश्वर देवस्थान आणि चासनळी येथील श्री रामेश्वर देवस्थान यांना ‘क’ वर्ग दर्जा देण्याची मागणीही त्यांनी केली. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याची माहिती काळे यांनी दिली. शुक्रवारी (दि. १५) जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यावेळी आ. आशुतोष काळे बोलत होते.
काळे म्हणाले, “मतदारसंघातील अनेक गावांमध्ये विजेचे खांब वाकलेले असून तारा लोंबकळत आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार प्रत्यक्ष परिस्थितीचे छायाचित्रे पाठवूनही ‘मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर काम करू’ अशी वेळकाढूपणाची उत्तरे दिली जात आहेत. पावसाळा तोंडावर आला असून वादळी वाऱ्यामुळे वाकलेले खांब कोसळून वीजवाहिन्या तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना द्याव्यात.”
सुरेगाव येथील महानुभाव पंथीय श्री चक्रधर स्वामी देवस्थानाला ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आल्याची नोंद कार्यवाही पुस्तिकेत आहे. मात्र निधी देताना हा दर्जा नसल्याचे सांगितले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आरोग्य सुविधांबाबत बोलताना काळे म्हणाले, “मागील बैठकीत मंजूर झालेल्या रुग्णवाहिका अद्याप कोपरगाव तालुक्याला मिळालेल्या नाहीत. त्या तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. तसेच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागासाठी निधी मंजूर असूनही काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात.”
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, संबंधित अधिकारी तसेच विविध मतदारसंघांतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
‘या’ देवस्थानांना ‘क’ वर्ग दर्जाची मागणी
वडगाव येथील श्री शनेश्वर देवस्थान आणि चासनळी येथील श्री रामेश्वर देवस्थान यांना ‘क’ वर्ग दर्जा देण्याची मागणी आ. काळे यांनी केली. सदर प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आला आहे. त्या ठिकाणी एकही झाड नसल्याचा दाखला वन विभागाने दिला असून निर्वनीकरणही पूर्ण झाले आहे. तरीही जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS