Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोहा येथील सार्वजनिक बांधकाम विभागात ‘गायब’ अधिकारी; कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

लोहा : लोहा येथील सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेला ढिसाळ व बेजबाबदार कारभार आता उघडकीस येऊ लागला असून, शासकीय वेळेत अधिकारी व कर्मचारी कार्य

किनवट आरोग्य विभागात ‘टक्केवारी’चा व्हायरस? उपकेंद्र बळकटीकरण निधीवर डल्ल्याचा आरोप; बनावट पावत्या व कोर्‍या धनादेशांचा खेळ उघड
किनवट आरोग्य विभागात ’लक्ष्मी दर्शन’चा विळखा; ’आशा’ स्वयंसेविकेच्या हक्कावर भ्रष्टाचाराची कुर्‍हाड!
मुंबई महापालिकेच्या 122 अभियंत्यांच्या बदल्या अखेर रद्द

लोहा : लोहा येथील सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेला ढिसाळ व बेजबाबदार कारभार आता उघडकीस येऊ लागला असून, शासकीय वेळेत अधिकारी व कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असताना, संबंधित अधिकारी साईटवर गेले आहेत या एकाच ठराविक उत्तरामागे लपून बसत असल्याचे चित्र आहे.
कार्यालयात कोणतेही हालचाल रजिस्टरच उपलब्ध नसल्यामुळे अधिकारी नेमके कुठे गेले, कोणत्या साईटवर आहेत, याची अधिकृत नोंदच ठेवली जात नाही. त्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी अधिकार्‍यांची चौकशी केल्यास कर्मचार्‍यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून, साईटवर आहेत एवढेच सांगितले जाते; मात्र साईटचे ठिकाण विचारल्यास माहिती देण्यास स्पष्ट टाळाटाळ केली जाते. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांचे शासकीय कामकाज ठप्प झाले आहे. बांधकाम परवानग्या, दुरुस्ती कामे, निधी प्रस्ताव यांसारखी महत्त्वाची कामे प्रलंबित राहून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शासकीय कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे ही प्राथमिक जबाबदारी असताना, अधिकार्‍यांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे. विशेष म्हणजे, साईट भेटीची कोणतीही अधिकृत नोंद नसल्यामुळे अधिकारी खरोखरच कामावर आहेत की केवळ कारणे सांगून गैरहजर राहतात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ही बाब केवळ शिस्तभंगाची नसून, शासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित करणारी आहे. स्थानिक नागरिकांनी या गंभीर प्रकाराविरोधात संताप व्यक्त करत संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. कार्यालयात बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीने लागू करणे, हालचाल रजिस्टर अनिवार्य करणे व कामकाजावर नियमित देखरेख ठेवणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. जर याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर हा निष्काळजीपणा पुढे अधिक गंभीर रूप धारण करू शकतो, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. आता वरिष्ठ प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणे, हीच काळाची गरज आहे.

COMMENTS