Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, ही तर दिल्लीश्‍वरांची इच्छा

लागोपाठ तीन नेत्यांच्या विधानामुळे चर्चांनी धरला जोर

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील राजकीय घडामोडीमुळे काय घडेल, याचा नेम नाही. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात फेरबदल होण्य

अजित पवारांना मिळणार अर्थखाते ?
बारामती जिंकण्यासाठी अजित पवारांनी रणशिंग फुंकले
शिरूरमधून आमचाच उमेदवार निवडून आणू

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील राजकीय घडामोडीमुळे काय घडेल, याचा नेम नाही. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आमदार अमोल मिटकरीनंतर, मंत्री अनिल पाटील यांनी तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आमच्यासह दिल्लीश्‍वरांची इच्छा असल्याचे मत व्यक्त करून या चर्चांना बळ दिले आहे, त्यामुळे अजित पवारांच्या गळ्यात लवकरच मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल, असे बोलले जात आहे, मात्र यावर अजित पवारांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.
राज्य सरकारमधील दोन मंत्री व अजितदादा समर्थक एका नेत्याच्या विधानामुळे आता या चर्चेला जोर चढला आहे. त्यामुळे शिंदे गट व भाजपमध्ये काहीशी अस्वस्थता आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनीही मुख्यमंत्री बदलाबाबत थेट वक्तव्य केले. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही दिल्लीश्‍वरांची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात जाऊन भाजपच्या सरकारमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांना भाजपने उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. मात्र, केवळ उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांनी एवढे मोठे धाडस केले नसल्याचीही आतल्या गोटात चर्चा आहे. राज्यातील विरोधक उघडपणे हे बोलून दाखवत आहेत. एकनाथ शिंदे गटाने वेळोवेळी स्पष्ट शब्दांत ही चर्चा फेटाळून लावली आहे. मात्र, आता अजित पवार गटाचे दोन मंत्री व एका मोठ्या नेत्यानेच सूचक वक्तव्य केल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व अजितदादांचे विश्‍वासू सहकारी सुनील तटकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाबद्दल भाष्य केले आहे. ’सरकारमध्ये सहभागी होतानाच याबाबत स्पष्टता झाली होती. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही राज्याच्या कानाकोपर्‍यातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, आम्ही आघाडीमध्ये काम करण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे तो प्रश्‍न उद्भवत नाही, असे सुनील तटकरे म्हणाले. ’भविष्यात अजित पवार हे मुख्यमंत्री व्हायला हवे अशी आमची भावना आहे. ते लवकरच मुख्यमंत्री होतील, असा विश्‍वास मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी व्यक्त केला. अर्थात, सध्याचे सरकारही चांगले काम करत आहे, हे सांगायला ते विसरले नाहीत.

10 ऑगस्टनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील ः पृथ्वीराज चव्हाण – आगामी लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केल्यास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढणार नाही, कारण ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. आता भाजपकडे अजित पवारांचा पर्याय आहे त्यांना मुख्यमंत्री केले जाईल, अशी भविष्यवाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. येत्या 10 ऑगस्ट दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतरबद्दल निर्णय होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे अजित पवार होतील. त्यांना ती जबाबदारी आगामी लोकसभा निवडणूक पाहता दिली होईल, असेही चव्हाण म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून करण्यात आलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांना भाजपकडून मुख्यमंत्री केले जाईल, अस सातत्याने बोलले जात आहे.

COMMENTS