Homeताज्या बातम्याबीड

महाराणी ताराबाई शाळेतून दहावी बोर्ड परीक्षेत कु.आर्या मुरकुटे 94.40 ड्ढ गुण घेऊन सर्वप्रथम

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मार्च-2026 मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकालात वडवणी शहरातील संस्कार शिक्षण म

शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांवर 100 रुपये बाँडचा अडथळा’300 पेक्षा जास्त मेडिकल प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळलेबाँड व नोटरीची अट दूर करून सर्व मेडिकल प्रस्ताव तातडीने निकाली काढावे : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेची मागणी
धुनकवाड-2 ची सुपुत्री अंजली विश्वनाथ भोसले हिचे घवघवीत यश
राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान : उपमुख्यमंत्री शिंदे



महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मार्च-2026 मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकालात वडवणी शहरातील संस्कार शिक्षण मंडळ संचलित महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 77.52 टक्के निकाल लागला असून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी उज्वल यशाच्या निकालाची परंपरा विद्यालयाने कायम ठेवली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी मार्च -2026 मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार दि.08 मे 2026 रोजी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असून वडवणी शहरातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 77.52 टक्के इतका लागलेला आहे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या परीक्षसाठी एकूण 267  विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 207 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  विद्यालयातून कु.आर्या मुरकुटे 94.40 टक्के गुण घेऊन सर्व प्रथम तर कु.श्रावणी सोळुंके 93.20 टक्के गुण घेऊन व्दितीय व चि. रोहित शिंदे 92.80 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक आला आहे.    विशेष प्राविण्य गुण घेऊन 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 39 विद्यार्थ्यांनी  प्रथम श्रेणी मिळवली आहे.  सर्व यशस्वी व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार श्री.केशवराव आंधळे तसेच विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष तथा युवा नेते संजय आंधळे, संस्थेचे अध्यक्ष अनिलदादा चोले,वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रणजीत धस,संस्थेचे संचालक इंजि.अशोक आंधळे व विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती शोभा के.आंधळे / डोईफोडे मॅडम,उपप्राचार्य मस्के सर,पर्यवेक्षक धाईतिडक सर,श्री.डोईफोडे सर,10 वी बोर्ड परीक्षाविभाग प्रमुख श्री.ठोंबरे सर,वर्गशिक्षक श्री.घोळवे सर,श्री.मुंडे ए.बी.सर,श्री.गिलबिले सर ,श्री.समर्थ सर,श्रीमती फलके मॅडम,श्री.कुलकर्णी सर,श्री.चोले सर सर्व विषय शिक्षक  यांच्यासह विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिकांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS